धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धर्माबादेत रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

धनगर समाजाच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. शासनाने आश्वासने देऊनही अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने धनगर समाजाकडून आंदोलने करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर धर्माबाद येथे धनगर समाजाच्या वतीने रस्त्यावर मेंढ्या थांबवून रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

धर्माबाद : आरक्षणासह इतर मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने सोमवारी (ता. 13) ला सकाळी पावणे बारा वाजता धर्माबाद येथील रेल्वेगेट नं. दोन जवळ कारेगाव रोडवर मेंढ्या थांबवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

धनगर समाजाच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. शासनाने आश्वासने देऊनही अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने धनगर समाजाकडून आंदोलने करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर धर्माबाद येथे धनगर समाजाच्या वतीने रस्त्यावर मेंढ्या थांबवून रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. आंदोलन दरम्यान, धर्माबादकडे जाण्यासाठी रुग्णवाहिका आल्याने रुग्णवाहिकेस जाण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी रस्ता मोकळा करून दिला.

दरम्यान, आंध्रा बसस्थानक जवळील खंडोबा मंदिर जवळ सकाळी दहा वाजता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. हा मोर्चा खंडोबा मंदिर पासून ते नरेंद्र चौक, पानसरे चौक, मोंढा मार्ग शिवाजी चौक ते रेल्वेगेट नं. दोन पर्यंत काढण्यात आला. मोर्चाचे रूपांतर सभेत करून रेल्वेगेट नं. दोन जवळ कारेगाव रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Stop the Dharmadabad route for the reservation of Dhangar community