पिशोर येथे धनगर समाजातर्फे रास्ता रोको

संतोष पाटील
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

सकल धनगर समाजातर्फे सोमवारी (ता. 13) सिल्लोड-कन्नड राज्यरस्त्यावरील सिल्लोड नाक्यावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी धनगर समजातील नागरिक मेंढ्यासह हजर होते, त्यामुळे दोन्ही बाजूला वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.

पिशोर (जि. औरंगाबाद) : पिशोर (ता. कन्नड) येथे धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जातीत करणे यासह इतर मागण्यांसाठी सकल धनगर समाजातर्फे सोमवारी (ता. 13) सिल्लोड-कन्नड राज्यरस्त्यावरील सिल्लोड नाक्यावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी धनगर समजातील नागरिक मेंढ्यासह हजर होते. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.

या प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीच्या औचित्य साधून प्रतिमेची संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली. सिल्लोड नाका येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदिश पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

धनगर समाजाच्या राज्यघटनेतील जातीविषयक यादीत धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्ती करून अनुसूचित जात प्रवर्गात समावेश करावा, हुतात्मा परमेश्वर धोंगडे यांच्या कुटुंबियास रोख पंचवीस लाख रुपये मदत आणि कुटुंबातील एका सदस्यास शासकीय सेवेत समाविष्ट करणे आदी मागण्याचे निवेदन श्री. पवार यांना देण्यात आले. 

याप्रसंगी धनगर समाजातील शेकडो नागरिक, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Stop the path by the Dhangar community at Pishor