तिसऱ्या दिवशीही हरभरा खरेदी बंद

उमेश वाघमारे
शुक्रवार, 18 मे 2018

जालना - मागील तीन दिवसांपासून बारदाना नसल्याने आणि वखार महामंडळाच्या गोदाम पूर्ण भरल्याने नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र बंद आहे.

नाफेडने गतवर्षी खरेदी केलेली तूर वखार महामंडळाच्या गोदामामध्ये आजही पडून आहे. त्यामुळे नव्याने खरेदी केलेला हरभरा ठेवण्यास वखार महामंडळाच्या गोदमामध्ये जगाच नाही. त्यात खरेदी केंद्रावर खरेदी केलेला हरभऱ्याच्या साठवणुकीसाठी नाफेडकडे पर्यायी सोय उपलब्ध नाही. 

दरम्यान, मागील तीन दिवसांपासून जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून बारदाना उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे सलग तीन दिवसांपासून हरभरा खरेदी केंद्र बंद आहे. आता थेट सोमवारी (ता.21) हरभरा खरेदी केंद्र सुरु होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात ता.29 मेपसुन हरभरा खरेदी केंद्र बंद होणार आहे, त्यामुळे नाफेडकडे ऑनलाइन नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Stop the purchase of gram

टॅग्स