औरंगाबाद - पाण्याच्या टाकीवर रोखले टँकर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

औरंगाबाद : शहरात पाण्याची ओरड सुरूच असून शनिवार सलग दुसऱ्या दिवशी नागरिकांनी सिडको एन-पाच येथील पाण्याच्या टाकीवर आंदोलन करून सुमारे दोन तास टँकर रोखले. दुपारी पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सिडको एन- सहा मथुरानगर येथे शनिवार सकाळी सहा वाजता पाण्याची वेळ होती. मात्र आठ वाजले तरीही पाणी न आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर धाव घेतली. या ठिकाणी नेहमीप्रमाणे टँकर भरण्यात येत होते. हे टँकर बघताच नागरिकांनी पाण्याच्या टाकीचे गेट लावून आंदोलन सुरू केले. सुमारे दोन तास आंदोलन सुरू होते. दरम्यान दुपारी पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी माघार घेतली. शुक्रवारी ही (ता.4) गुलमोहर काॅलनी भागातील नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर आंदोलन केले होते.

Web Title: stopped tanker at water supply tank in aurangabad