अवकाळी पावसाचा पुन्हा फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

- भोकरला वीज पडून एकाचा मृत्यू
- हिंगोलीत वादळी वाऱ्यामुळे आंब्यांचे नुकसान
- उस्मानाबाद जिल्ह्यात गारपीट
- बीड, लातूरमध्येही पावसाची हजेरी

औरंगाबाद - मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पुन्हा अवकाळी पाऊस झाला. वीज पडून तिघे ठार, तर 40 शेळ्या दगावल्या. फळबागांसह रब्बीतील काही पिकांचे मोठे नुकसान झाले. ऐन दुष्काळात बसत असलेल्या अवकाळी तडाख्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

परभणी जिल्ह्यात विजांचा कडकडाट, तुफान वारे, सोबतीला पाऊस असा अवकाळीचा रुद्रावतार सलग चौथ्या दिवशी सोमवारी सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. शेतआखाडे, कापणीला आलेली उन्हाळी ज्वारी, फळबागा, चाऱ्याचे मोठे नुकसान झाले. पाथरी तालुक्‍यातील आंधापुरी शिवारात वीज पडल्याने सुनवाडी (ता. धारुर, जि. बीड) येथील बालू सीताराम काळे, कृष्णा रामभाऊ शिंदे हे होरपळून जागीच ठार झाले. तसेच 40 शेळ्या दगावल्या असून, शेळीमालक रामभाऊ साधू शिंदे गंभीर जखमी झाले आहेत.

Web Title: Storm Rain Agriculture Loss