उस्मानाबाद, लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

औरंगाबाद/पुणे - उन्हाचा चटका वाढला असतानाच मराठवाड्यातील नांदेड, उस्मानाबाद व लातूरसह कोल्‍हापूर जिल्ह्यात रविवारी (ता. सहा) काही भागांत वादळी वारा व विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस झाला. उमरगा शिवारात वीज कोसळून शेतकरी व्यंकट सुग्रीव शिंदे यांची गाय व म्हैस दगावली आहे.

उस्मानाबादमधील मुरूम (ता. उमरगा) व जेवळी (ता. लोहारा) परिसरात सायंकाळी विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. लातूरमधील किल्लारी (ता. औसा), मदनसुरी व औराद शहाजनी (ता. निलंगा) या भागांतही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील बहुतांश भागात सायंकाळी पावसाचे वातावरण तयार झाले होते. नांदेडमधील मुखेड, बिलोली, धर्माबाद, कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यामध्ये जोरदार वाऱ्यासह पूर्वमाेसमी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली.

Web Title: storm wind rain