भन्नाट शक्कल..चोरीनंतर तो असेही करायचा!

मनोज साखरे 
बुधवार, 17 जुलै 2019

औरंगाबाद : चोरी करायचे मनात ठरवले तर तो पायीच निघायचा. चालता-चालताच कुणाच्याही घराजवळ दोरीवर वाळत घातलेला शर्ट घालायचा अन..चोरी करताच पसार होताना तोच शर्ट काढुन फेकुन द्यायचा. पोलिसांच्या हाती लागु नये, सीसीटीव्हीत कपड्यावरुन ओळख पटु नये म्हणून तो अफलातून प्रकार करायचा. याच मोडसवर त्याने आतापर्यंत आठवेळा चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. 

औरंगाबाद : चोरी करायचे मनात ठरवले तर तो पायीच निघायचा. चालता-चालताच कुणाच्याही घराजवळ दोरीवर वाळत घातलेला शर्ट घालायचा अन..चोरी करताच पसार होताना तोच शर्ट काढुन फेकुन द्यायचा. पोलिसांच्या हाती लागु नये, सीसीटीव्हीत कपड्यावरुन ओळख पटु नये म्हणून तो अफलातून प्रकार करायचा. यानुसार त्याने आतापर्यंत आठवेळा चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. 

राजेंद्र सुपडा चंडोल मुळ जनुना (जि. बुलढाणा) असे या संशयित चोराचे नाव आहे. त्याचे जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण, कुटुंबिय शेतीकाम राबत असताना तो शेतीपासून दुरच होता. छोट्या-मोठ्या हॉटेलात काम करायचा. तिथे स्वयंपाक शिकुन घेतला अन..औरंगाबाद गाठत हॉटेलात कामाला लागला. दोनवेळा हॉटेलात काम केल्यानंतर ते सोडून तो काही दिवसांपुर्वीच पुन्हा गावी गेला.

गंगाजळी संपल्याने तीन वर्षांपुर्वी केलेल्या चोरीची आठवण त्याला आली अन..तीच शक्कल पुन्हा लढविली. झटपट पैसा मिळवायचा, श्रीमंत व्हायचे या आसक्तीतून तो अकरा जुलैला रात्री औरंगाबादेत अवतरला. बारा जुलैला हडको भागात त्याने दोन महिलांची दागिने हिसकाविली. सीसीटीव्हीत अडकल्यानंतर पोलिसांनीही त्याला पकडलेच. त्यानंतर चौकशीतून त्याच्या अनेक अजब बाबी समोर आल्या. चोरीवेळी त्याने एका शैक्षणिक क्‍लासेसमधील तरुणाचा शर्ट त्याने घातला होता. हा प्रकार सीसीटीव्हीत आल्यानंतर एका परिचिताने पोलिसांना त्याची माहिती दिली अन..तो पोलिसांच्या गळाला लागला. त्याच्याकडून पोलिसांनी पाच तोळ्याचे दागिने, चार मोबाईल व दोन दुचाकीही हस्तगत केल्या. 

मलाही पैसेवाला बनायचेय! 
पोलिसांनी पकडल्यानंतर त्याला कुक असुनही चोरी का करतो असे विचारल्यानंतर त्याने ""माझे अनेक मित्र पैशावाले आहेत. मित्र पैसेवाले म्हणुन मलाही पैसेवाला बनयाचे होते. त्यासाठी मी चोरी केली.'' अशी असमर्थनीय बाबच त्याने पोलिसांनी सांगितली. 

पहिली चोरी तीनवर्षांपुर्वी 
राजेंद्र औरंगाबादेत हॉटेलमध्ये कामाला होता. त्यामुळे हडको-सिडको परिसरातील गल्लीबोळाची त्याला चांगली माहिती आहे. याचाच फायदा घेत त्याने हडको-सिडको भाग टार्गेट केला. त्याच भागातून त्याने पाच ते सहावेळा चोऱ्या केल्या. तीन वर्षांपुर्वी त्याला गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यावेळी पहिल्यांदा त्याने मंगळसुत्र चोरी केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strange Mind for Theft in Aurangabad