भीतीपोटी हाड हाड! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

जालना - शहरातील नूतन वसाहतीलगत होत असलेल्या मांसविक्रीमुळे सायंकाळी शेकडो कुत्र्यांची गर्दी जमत आहे. त्यामुळे पादचारी आणि वाहनधारकांमध्ये रोजच भीतीचे वातावरण असते. या भागात सायंकाळी भीतीपोटी अनेकांनी दिलेला हाड हाड असा आवाज ऐकू येत आहे. 

जालना शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांच्या संख्येकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या टोळीचा वावर वाढला आहे. नूतन वसाहत येथे तर दररोज शेकडो कुत्र्यांची गर्दी होत आहे. त्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी येणारे नागरिक, शिकवणी वर्गातून परतणारे विद्यार्थी यांना नेहमी या कुत्र्यांची भीती असते.

ऐन रस्त्यालगत असलेल्या या परिसरात कुत्रे एकत्र येतात. यामुळे  रेल्वे उड्डाणपुलावरून अंबड चौफुलीकडे जाणाऱ्या वाहनधारकांचा कुत्रे आडवे येऊन अपघात होण्याचा धोका वाढला आहे. वाढलेल्या भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. 

एवढे कुत्रे आले कोठून? 
जालना शहरात अलीकडेच कुत्र्यांची संख्या अचानक वाढल्याचे दिसत आहे. शहरात इतके कुत्रे आले कोठून? असा सवाल नागरिक विचारत आहेत. अन्य शहरांतील कुत्रे परिसरात आणून सोडले तर जात नाहीत ना, अशी शंका आता उपस्थित होत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stray dogs on road

टॅग्स