मंदिरात मांसाचे तुकडे फेकल्याने जिंतूरमध्ये तणाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

जिंतूर : शहरातील दादा शरीफ चौकात असलेल्या मारोती मंदिराची बुधवारी (ता. 22) दुपारी अज्ञात व्यक्तीनी विटंबना केल्याने शहरात तणाव निर्माण होऊन बाजारपेठ बंद झाली. उशिरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल झाला नव्हता.

जिंतूर : शहरातील दादा शरीफ चौकात असलेल्या मारोती मंदिराची बुधवारी (ता. 22) दुपारी अज्ञात व्यक्तीनी विटंबना केल्याने शहरात तणाव निर्माण होऊन बाजारपेठ बंद झाली. उशिरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल झाला नव्हता.

येथील दादा शरीफ चोकातील हनुमान मंदिरात बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास कोणी तरी अज्ञात व्यक्तीने प्राण्यांची हांडे आणून टाकली. ही बाब लक्षात येताच काही युवकांनी तात्काळ बाजारपेठ बंद केली. अचानक झालेल्या प्रकारामुळे एकच धांदल उडाली. यावेळी 200 ते 300 तरुणांचा जमावाने घोषणाबाजी सुरू केली. व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करून हा जमाव शहरातील राम मंदिरामध्ये एकत्र आला. यावेळी पोलिसांनी तरूणांची समजूत काढली.

आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा होईल, असे आश्वासन उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी तरुणांना दिले. त्यानंतरही या तरुणांनी  शहरातील प्रत्येक भागात बाजारपेठ बंद केली. बकरी ईद असल्याने पोलिसांकडे मोठा बंदोबस्त होता. घटना घडताच मोठा बंदोबस्त ठिकठिकाणी लावण्यात आला.

दरम्यान, आमदार विजय भांबळे यांनीही घटनेची माहिती मिळताच मारूती मंदिराकडे धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
 

Web Title: stress in jintur due to pieces of bones in temple