परभणी: मुलीची छेड काढल्यावरून पाथरीत तणाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक शाळकरी मुलगी शाळेत जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या काही तरूणांनी तिला छेडले. त्या मुलीने ही घटना तिच्य पालकांना सांगितली.

पाथरी - शाळकरी मुलीची छेड काढल्याप्रकरणी आज (मंगळवार) पाथरी शहरात दोन गटात वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारी व दगडफेकीमध्ये झाल्याने पाथरी शहरात तणावपूर्ण वातावरण आहे. सध्या शहरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, शहर पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक शाळकरी मुलगी शाळेत जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या काही तरूणांनी तिला छेडले. त्या मुलीने ही घटना तिच्य पालकांना सांगितली. तिचे पालक व काही नातेवाईक घटनास्थळावर आले. छेड काढणाऱ्या मुलांना मारहाण करून त्यांना पोलिस ठाण्यात आणले. ही माहिती शहरात समजताच अनेकजण पोलिस ठाण्यात आले.

त्या ठिकाणी दोन गटात वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसण हाणामारीमध्ये झाले. काही समजण्याच्या आतच पोलिस ठाण्यावर एका गटाच्यावतीने तुफान दगडफेक करण्यात आली. दगडफेक सुरु झाल्यानंतर गावात गोंधळ उडाला. आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पोलिस ठाण्याजवळ येऊन लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. उपविभागीय पोलिस अधिकारी रेणूका वागळे यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन गावात पोलिस बंदोबस्त वाढविला. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.

Web Title: stress situation in pathari village

टॅग्स