esakal | हिंगोलीत कडकडीत बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli

हिंगोलीत कडकडीत बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : हिंगोलीत (Hingoli) उत्तर प्रदेशातील लखिमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ सोमवारी ता. ११ कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. महाविकास आघाडीतर्फे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, रिपाई गवई गटाचे प्रदेश सरचिटणीस मधुकर मांजरमकर, रिपाई कवाडे गटाचे मराठवाडा अध्यक्ष गणेशराव पडघन गुरुजी, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेख खलील बेलदार, माजी आमदार संतोष टारफे, रिपाई कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भिसे, तसेच मिलींद उवाळे, शामराव जगताप, माधव कोरडे, जावेदराज, दतराव नवघरे, राम कदम, बापुराव वांगर, बी. डी. बांगर, विशाल इंगोले, डॉ. राजेश भोसले आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा: Hingoli : उत्तर प्रदेशातील लखिमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे , उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथे भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची मुलाने आंदोलन करत्या शेतकऱ्यांचा अंगावर वाहन घालून चार शेतकऱ्यांची निर्दयपणे हत्या केली.

loading image
go to top