मराठा क्रांती मोर्चाचे उपोषण अखेर मागे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

परळी वैजनाथ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या व इतर मागण्यांसाठी येथे रविवारपासून (ता. 25) सुरू केलेले बेमुदत उपोषण सोमवारी (ता. 3) नवव्या दिवशी मागे घेण्यात आले. उपोषणाच्या माध्यमातून अनेक मागण्या शासनाकडे करण्यात आल्या. यापैकी बऱ्याच मागण्या शासनाने विचाराधीन घेतल्या आहेत. काही मागण्या पूर्ण होण्यासंदर्भात पावले उचलली आहेत. यामुळे हे उपोषण मागे घेतल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. 

तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले होते. हे उपोषण सोमवारी (ता. तीन) मागे घेण्यात आले. सकाळी जिजाऊ वंदना घेण्यात आली. नंतर अनेकांनी मनोगत व्यक्त केले. शासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार सदानंद बरदाळे व बी. एल. रुपनर यांनी आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यानंतर लगेच वैष्णवी साबळे या विद्यार्थिनीच्या हस्ते सरबत घेऊन उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनस्थळी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Web Title: strike back by maratha kranti morcha