फुलंब्रीत व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

फुलंब्रीत व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

फुलंब्री : आताच्या सरकारने व्यापाऱ्यांवर अनेक प्रकारचे निर्बंध घालून ऑनलाइन प्रक्रिया सुरु केल्याने व्यवसाय अडचणीत आला आहे. ऑनलाईन खरेदीचा स्थानिक व्यापाऱ्यांना फटका बसत असून शासनाच्या या दुपट्टी धोरणांचा निषेध करण्यासाठी 28 सप्टेबरच्या फुलंब्री बंद आवाहन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने फुलंब्रीतील मेडिकल या अत्यावश्यक सेवेसह सर्वच व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने शुक्रवारी (ता.28) सकाळ पासूनच बंद ठेऊन शासनाच्या धोरणांनाचा निषेध केला आहे.

सध्या व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय करणे कसरतीचे झाले आहे. आपण शासनाला कर भरतो त्याप्रमाणे मोबदला आपल्याला मिळतो का? याचे चिंतन करणे गरजेचे आहे. स्थानिक टँक्स भरणा, लाईट बिल, शासनाचा कर आदी वेळोवेळी भरावा लागत असल्याने व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे अवघड झाले आहे. त्यामुळे अन्यायाच्या विरोधात व्यापाऱ्यानी आवाज उठवण्याची गरज आहे. अडचण आल्यावर एकत्र येण्यापेक्षा आताचा सर्व व्यापारी संघटनांनी एकत्र येणे गरजेचे आहे. ऑनलाईन पद्धतीमुळे ग्राहकांची फसवणूक होते आणि स्थानिक व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढतात. स्थानिक लोकांचे व्यापार बसले आहे. बेरोजगारीत वाढ होतांना दिसून येत आहे. त्यामुळे फुलंब्रीतील व्यापाऱ्यानी शंभर टक्के आपापली दुकाने कडकडीत बंद ठेऊन संपत सहभागी झाले होते.  

दबावाला बळी पडणार नाही 
सध्या अनेक राजकीय पक्षाचे आंदोलने, रस्ता रोको आदी प्रकारचे आंदोलने करतात. त्यावेळी सर्व व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात येते. राजकीय दबावाला बळी पडून व्यापारी आपापले दुकाने बंद ठेवतात. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जे व्यापारी दररोजच्या दररोज माल घेतात आणि विकतात त्यांना हा बंद परवडत नाही. त्यामुळे दररोजच्या रोजीरोटीचा प्रश्न त्यांचानिर्माण होतो. ज्याना बंदचे आवाहन करायचे त्यांनी आगोदर निवेदन द्यावे, त्यावर महासंघ चर्चा करून निर्णय घेईल. त्यामुळे इथून पुढे व्यापारी महासंघ कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडणार नसल्याचे व्यापारी महासंघाच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com