Sun, May 28, 2023

Sillod News : कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट
Published on : 14 March 2023, 8:55 am
सिल्लोड : कर्मचार्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे शहरातील सर्वच शासकीय कार्यालयात मंगळवार (ता.14) रोजी शुकशुकाट बघावयास मिळाला. तहसील कार्यालय, पंचायत समितीमध्ये दररोज असलेली गर्दी नसल्याने कार्यालये ओस पडलेली होती. पंचायत समिती कार्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले.
यावेळी गटविकास अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. नवी पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. संपाच्या दिवशी बहुतांश कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कार्यालयात शुकशुकाट होता.