सर, तुम्हाला नोबेल का नाही ?

latur
latur

लातूर : सर, इतक्या संशोधन, लेखानानंतरही तुम्हाला नोबेल का मिळाला नाही, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने थेट खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना विचारला. त्यावर नारळीकर सर मिस्कील शैलीत म्हणाले, "नोबेल का नाही, हा प्रश्न पुरस्कार देणाऱ्या समितीला विचारायला हवा." नोबेल मिळालेच पाहिजे असे काही नाही. इतर पुरस्कार आहेतच की. आपण फक्त आपले काम चोखपणे करत पुढे गेले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्याला दिला.

हा संवाद रंगला होता लातूरमधील श्री मारवाडी राजस्थान विद्यालयात. रविवार असतानाही वेगवेगळ्या शाळांतील विज्ञानप्रेमी विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. त्यांच्याशी डॉ. नारळीकर सरांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. तुम्ही खगोलशास्त्राकडे कसे वळलात, परदेशात संधी असतानाही तिथे स्थायिक न होता भारतात का आलात, शास्त्रज्ञ होण्यासाठी कोणती तयारी करावी लागते, ताऱ्यांचे समूह एकमेकांवर आदळतात तेंव्हा काय होते, इतर गृहांवर आपल्यासारखी जीवसृष्टी असेल काय...? असे कितीतरी प्रश्न मुलांनी नारळीकर सरांना उत्सुकतेपोटी विचारले. त्यामुळे खगोलशास्त्राचा आनंददायी तास उत्तरोत्तर रंगत गेला.

डॉ. नारळीकर म्हणाले, "पाठांतर करून वैज्ञानिक होता येत नाही. हे लक्षात ठेवा. त्यासाठी विषय मनापासून आवडला पाहिजे. तो समजला पाहिजे. मनात सतत प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. तर आपल्याला या विषयात पुढे जाता येईल. लगेच वैज्ञानिक होता येत नाही. आपल्या समाजात वैज्ञानिकांना चांगले स्थान आहे. परदेशाइतके नसेल; पण आहे हे मान्य करावे लागेल. आपल्याकडील विज्ञानातील प्रगतीचे वातावरण वाढेल, म्हणूनच मी भारतात परत आलो."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com