करिअरची ‘यशाची गुरुकिल्ली’ सात जूनला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जून 2019

कार्यशाळेची वैशिष्ट्ये 
आत्मविश्‍वास वाढवा, स्वतःला घडवा 
बारावीनंतरच्या करिअरच्या संधी 
येणाऱ्या काळात शिक्षण क्षेत्रात होणारे बदल 
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील करिअरची विविध क्षेत्रे 
अंगभूत गुण, कौशल्ये व विद्यार्थ्यांचा कल यांचा विचार करून करिअरची निवड कशी करावी?
अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी 
विद्यार्थी व पालकांचे शंका-निरसन 

कोठे? - परिमल मंगल कार्यालय, नाईकवाडीनगर, समता कॉलनी, उस्मानाबाद. 
केव्हा? - शुक्रवार (ता. ७ जून) 
कधी? - सायंकाळी साडेचार ते सात

अधिक माहितीसाठी संपर्क
सतीश पाटील - ९६८९७४८४९९

उस्मानाबाद - दहावी, बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतर पुढे काय? हा प्रश्‍न सर्वांसमोर असतो. अशावेळी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन लाभले तर करिअरला एक नवी दिशा मिळू शकते. निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शन संबधित विषयातील तज्ज्ञांकडून मिळाले तर अधिक उपयुक्त ठरते. हे लक्षात घेऊन ‘सकाळ माध्यम समूह’ व संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यातर्फे ‘यशाची गुरुकिल्ली’ या करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 

यामध्ये डिप्लोमा, बारावी, पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी विशेष कार्यशाळा होणार असून त्यामध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व वक्‍ते करिअर निवडीसंदर्भात मोफत मार्गदर्शन करतील. आत्मविश्‍वास कसा वाढवावा, उच्चशिक्षणातील विविध संधी, कोणते क्षेत्र करिअर म्हणून निवडावे, योग्य महाविद्यालय व विद्यापीठ कसे निवडावे, प्रवेशप्रक्रिया कशी असेल यासाठी काय तयारी करावी, स्वयंप्रोत्साहनाची तंत्रे आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन या कार्यशाळेत केले जाणार आहे. या कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांना तज्ज्ञ वक्‍त्यांकडून प्रेरणादायी विचार ऐकण्याची संधी मिळणार असून, करिअरबाबत येणाऱ्या त्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात येणार आहे.

संजय घोडावत विद्यापीठातर्फे प्रामुख्याने अभियांत्रिकी, आर्किटेक्‍चर, व्यवस्थापन, कला, विज्ञान, वाणिज्य या विभागाअंतर्गत अभ्यासक्रम राबविले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांची पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी.पर्यंत पदवी संपादन करण्याची संधी उपलब्ध आहे. नावीन्याचा व गुणवत्तेचा ध्यास घेत घोडावत विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता गरजेच्या असणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच विद्यापीठात कौशल्य शिक्षण मिळावे, याकरिता विद्यापीठामध्ये तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापकांकडून उपक्रमशील प्रयत्न सातत्याने केले जातात. जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविलेल्या विद्यापीठातर्फे समाजाच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. 
बारावीमध्ये उत्तुंग यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव बारावीमध्ये ६० टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना ‘सकाळ माध्यम समूह’ व संजय घोडावत विद्यापीठातर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student Career Yashachi Gurukilli Event Education Guidance