पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

मंगळवारी सकाळीच यशने पोहणे चालु केले पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. नंतर त्यास बाहेर काढण्यात आले.  

अंबाजोगाई (जि. बीड) - उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पोहायला गेलेल्या यश नंदकुमार देशपांडे (वय 16) या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. 8) सकाळी सुमारास अंबाजोगाई शहरातील स्वा. रा. ती. शासकीय रुग्णालय परिसरात घडली.  

या घटनेची माहिती अशी की, यशनेे नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरु असल्याने यश याने सुट्टीमुळे पोहायला सुरू केले होते. जवळच तलाव असल्याने तो पोहायला जात होता. मंगळवारी सकाळीच यशने पोहणे चालु केले पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. नंतर त्यास बाहेर काढण्यात आले. परंतु तोवर खूप उशीर झाला होता. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The student died by drowning

टॅग्स