प्रवेशाच्या 'सार' प्रणालीत गोंधळ फार

हरी तुगावकर
शुक्रवार, 14 जून 2019

लातूर : वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी या करीता शासनाने या वर्षी `सेतू अस्टीटंट अॅडमिशन रजिस्टर` (सार) ही प्रणाली सुरु केली आहे. या प्रक्रियेत सध्या अनेक त्रुटी असल्याने पालक आणि विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. थोडी जरी चूक झाली तर प्रवेशापासून वंचित रहावे लागते की काय अशी भिती त्यांच्यात आहे. या प्रक्रियेत सुलभता आणण्याची गरज आहे.

५२ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया

लातूर : वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी या करीता शासनाने या वर्षी `सेतू अस्टीटंट अॅडमिशन रजिस्टर` (सार) ही प्रणाली सुरु केली आहे. या प्रक्रियेत सध्या अनेक त्रुटी असल्याने पालक आणि विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. थोडी जरी चूक झाली तर प्रवेशापासून वंचित रहावे लागते की काय अशी भिती त्यांच्यात आहे. या प्रक्रियेत सुलभता आणण्याची गरज आहे.

५२ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया

वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, मत्स्यविज्ञान, फाईऩ आर्टस, आयुष अशा ५२ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. गेल्या वर्षीपर्यंत अभ्यासक्रमनिहाय स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया होती. या वर्षी मात्र शासनाने प्रवेश सुलभतेसाठी `सार` ही प्रणाली सुरु केली. यावर कशा पद्धतीने प्रवेशाचे अर्ज भरावयाचे आहेत याची माहिती पालक विद्यार्थ्यांना नाही. संबंधीत यंत्रणेला देखील नाही. त्यामुळे सध्या पालक आणि विद्यार्थी वेगवेगळ्या साबयर कॅफेचा आधार घेताना दिसत आहेत.

ना माहितीपत्रक ना नोटिफिकेशन

अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रकियेचे माहितीपत्रक विद्यार्थ्यांना देणे गरजेचे असते. पण `सार`वर कोणत्याही प्रकारचे माहितीपत्रक दिलेले नाही. ता. सात जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरु करावी अशी माहिती आहे. त्याची अंतिम तारीख किती आहे, याचीही माहिती नाही.  प्रवेशाच्या नोटीफिकेशनचीही तारीख देखील यात दिलेली नाही. ऑनलाईऩ अर्ज भरल्यानंतर पुढची प्रक्रिया कधी याचीही माहिती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यात संभ्रम आहे.

अर्जात सातत्याने बदल
`सार`वरून विद्यार्थ्याना प्रवेशासाठी एकच अर्ज दाखल करायचा आहे. त्यावर विलिंगनेस दाखवायचे आहेत. पण या अर्जात सातत्याने बदल केला जात आहे. पहिले चार दिवस तर अर्जात आर्थिक दृष्ट्या मागास हा प्रवर्गच दिला नाही. जात पडताळणी प्रमाणपत्राची सर्व माहिती विचारली गेली नव्हती. ती आता विचारली गेली आहे. सातत्याने अर्जात बदल केला जात असल्याने विद्यार्थ्यात गोंधळ उडत आहे.

प्रवेशाच्या तोंडावर `सार` ही प्रणाली सुरु केली आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यात गोंधळ उडत आहे. त्यात प्रवेश अर्जात रोज काही ना काही अपडेट केले जात आहे. असे न करता एकदाच अपडेट करणे गरजेचे आहे. शासनाने नियुक्त केलेले सेतू केंद्राच्या प्रशिक्षीत संस्थांची संख्या अत्यंत कमी आहे. शासकीय महाविद्यालयात अधिक सेतू केंद्र देणे गरजेचे आहे.
- प्रा. शिवराज मोटेगावकर, लातूर

नवीन प्रवेश प्रक्रिया असल्याने गोंधळ उडत आहे. माहितीपत्रक नाही. नोटीफिकेशनची तारीख नाही. प्रवेश अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख नाही. या नवीन प्रक्रियेपासून विद्यार्थी आणि पालक अनभिज्ञ आहेत. दाखल करावयाच्या कागदपत्रातही गोंधळ आहे. सेतू केंद्राची संख्या कमी असल्याने ही प्रक्रिया दीड महिना चालेल की अशी भिती आहे. सुलभता आणणे गरजेचे आहे.
- सचिन बांगड, प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक, लातूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student faces problem in SAAR system for admission