वरूड गवळीत विद्यार्थांची घोड्यावरून मिरवणूक

मंगेश शेवाळकर
सोमवार, 17 जून 2019

हिंगोली : हिंगोली तालुक्यातील वरूड गवळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी (ता. 17) इयत्ता पहिली वर्गामधे  नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची घोड्यावरून मिरवणूक काढून त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. या आगळ्यावेगळ्या फेरीचे जिल्हाभरात कौतुक केले जात आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये नवीन शैक्षणिक सत्राला आज पासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे शाळांमधून बच्चेकंपनीचा किलबिलाट सुरू झाला आहे. शाळा प्रवेशाच्या दिवशी गावातून फेरी काढून जनजागृती करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमधून फेरी काढण्यात आली.

दरम्यान, हिंगोली तालुक्यातील वरूड गवळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने इयत्ता पहिली वर्गात नवीन प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांची घोड्यावरून मिरवणूक काढली. पहिल्या दिवशी 33 विद्यार्थी पहिल्या वर्गात शाळेत प्रवेशित झाले. या सर्व विद्यार्थ्यांची केळी काढून त्यांना शाळेत आणण्यात आले. त्यानंतर या विद्यार्थ्यांचा शाळा व्यवस्थापन समिती व शाळा प्रशासनातर्फे सत्कार करून पुष्पगुच्छ भेट देण्यात आले. याशिवाय शाळेतील पावणेतीनशे विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके देण्यात आली.

शाळेच्या पहिल्या दिवशी पोषण आहारामध्ये गोड भात देऊन विद्यार्थ्यांच्या तोंड गोड करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सुभाष जिरवणकर, संजय मुधोळ सुभाष बेंगाळ, साहेबराव दिपके, फुलचंद महाजन, गोविंद चूनडे, संगीता देशमुख, संगीता भास्कर देशमुख, करूना वाठोरे शिवाजी नवखेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सखाराम बेंगाळ, गजानन बेंगाळ, सरपंच श्री बेंगाळ, रेखाबाई धुळे जनाबाई बोरकर, अरूणाबाई वाव्हळ यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती. शाळेने नऊ प्रवेशित विद्यार्थ्यांची घोड्यावरून काढलेली फेरी जिल्हाभरात कौतुकाचा विषय बनली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student horse ride on first day of school at Hingoli