स्टूडंट इस्लामिक ऑर्गनायझेशनतर्फे दिला जातोय मानवतेचा संदेश

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : देशात रंग, वर्ण आणि जातीपातीच्या आधारावर जुलूम व अत्याचाराच्या घटनांत वाढ होत आहे. त्याअनुषंगाने स्टुडंट्‌स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ) दक्षिण महाराष्ट्राच्या वतीने एक राज्यस्तरीय मोहीम राबविण्यात आली असून, त्याद्वारे समाजात शांतता आणि सुव्यवस्था नांदावी, समता व बंधुत्वाची भावना वृद्धिंगत व्हावी, "एक ईश्वर, एक मानवी कुटुंब' या मोहिमेद्वारे प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती मोहिमेचे समन्वयक इंजिनिअर खिजर शिबीबी यांनी सोमवारी (ता. 30) पत्रकार परिषदेत दिली. 
21 सप्टेंबरला सुरवात झालेल्या या मोहिमेचा समारोप सोमवारी (ता. 30) करण्यात आला. या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील जवळपास 60 लाख लोकांपर्यंत विशेषतः विद्यार्थी व युवकांपर्यंत मानवीय समता आणि एकात्मतेचा संदेश पोचविण्यात आला. सदर मोहीम कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्याबरोबरच वीस जिल्ह्यांमध्येही राबविण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत चर्चासत्र संगोष्ठी, शाळा, महाविद्यालयांत व्याख्यान, मानवी साखळी आदींच्या माध्यमातून जवळपास 100 लहान-मोठ्या शहरांमधील विद्यार्थी व युवकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या मोहिमेदरम्यान मीरा रोड, लातूर, सोलापूर आणि जालना येथे पाच "मानवी साखळ्या' उभारल्या गेल्या आणि त्याचवेळी मुस्लिमेतर बांधवांमध्ये इस्लामची खरी प्रतिमा सादर करण्यासाठी विविध ठिकाणी "मशीद परिचय' कार्यक्रमही घेतले गेले. 

भांडवलशाहीत केवळ गरजांच्याच पूर्तता 

एसआयओचे दक्षिण महाराष्ट्रचे अध्यक्ष सलमान अहमद म्हणाले की, ""आपण भांडवलशाहीच्या मागे पळून केवळ आपल्या गरजांच्या पूर्तता करीत आहोत, तर दुसरीकडे समाजात होत असलेल्या अन्याय व अत्याचाराच्या घटनांपासून अनभिज्ञ आहोत. त्यामुळे अशा चिंताजनक वातावरणात लोकांना त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीव करून देऊन ती पार पाडण्याची जाणीव करून देण्याचीही गरज आहे. यामुळे प्रेम व सहानुभूतीच्या वातावरण निर्मितीला मदत मिळू शकेल आणि या विचारांच्या आधारावरच व्यक्ती व समाजाचे कल्याण होणे शक्‍य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com