Coronavirus : जालना येथील कोरोना रुग्णाचे रांजणी कनेक्‍शन

पाहणी करताना अधिकारी.
पाहणी करताना अधिकारी.

घनसावंगी, जि. जालना, ता. ६ (बातमीदार) - जालना शहरात कोरोना बाधित महिला आढळून आली. या महिलेची मुलगी तालुक्यातील रांजणी येथे शिक्षिका आहे. दरम्यान, तिच्या उपस्थितीत रांजणी येथे शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला. त्यामुळे या शिक्षिकेच्या संपर्कात आलेले पालक आणि विद्यार्थ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. 

दरम्यान, सोमवारी (ता. सहा) दुपारी उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार गौरव खैरनार, जिल्हा परिषद आरोग्य सभापती पूजा कल्याण सपाटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नागेश सावरगावकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सी. डी. शेवगण, गटविकास अधिकारी अंकुश गुंजकर, नायब तहसीलदार संदीप मोरे, पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवार, मंडळ अधिकारी श्री. काळे यांच्यासह पोलिस कर्मचारी व महसूल यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी गावांत जाऊन पाहणी केली. शिवाय या शिक्षिकेच्या संपर्कात आलेल्या पालक व विद्यार्थ्यांची माहिती घेतली. सदर शिक्षिका दिल्ली येथून ट्रेनिंग घेऊन आलेली आहे.

दोन खासगी रुग्णालयांत घेतले उपचार 
विलगीकरण कक्षात दाखल होण्यापूर्वी जालन्यातील कोरोनाबाधित महिलेने शहरातील दोन हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. त्यानंतर तिच्या मुलीने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले होते. त्यामुळे तिच्या संपर्कात आलेले खासगी डॉक्टर व इतरांचा शोध घेण्यात येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगितले आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

  
संपर्कातील ५५ जणांचे घेतले नमुने 
कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ५५ जणांचे नमुने घेऊन ते पुण्याला पाठविण्यात आले आहे. यात रुग्णाच्या कुटुंबातील १५, दोन खासगी रुग्णालयातील २० जण आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात तिच्यावर उपचार करणारे २० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.  

शहागड येथील २६ जणांचा अहवाल निगेटिव्ह
कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेली महिला न्यूमोनिया झाला म्हणून शनिवारी (ता. चार) दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती झाली होती. डॉक्टरांना संशय आल्याने या महिलेसह इतर ३१ जणांचे नमुने रविवारी (ता. पाच) पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यात शहरातील ६५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहागड येथील २६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले. कोरोनाबाधित महिला शहरातील दुखीनगर भागातील रहिवासी असल्याचे समोर आल्यानंतर हा भाग सील करण्यात आला. तसेच या भागात अग्निशमन दलाच्या वाहनाद्वारे रासायनिक फवारणी करण्यात आली. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com