विद्यार्थ्याची गळफासघेवून आत्महत्या

हरी तुगावकर
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

लातूर : कोळपा (ता. लातूर) येथील वसतीगृहात सोमवारी (ता. 22) डी.फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यांने गळफास घेवून आत्महत्या केली. प्रवीण चव्हाण (वय 19 रा. मंचातांडा ता. उदगीर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्या मृतदेहा जवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून आर्थिक विंवचनेतून आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

या प्रकरणाचातपास विवेकानंद चौक पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्या आर्थिक विंवचनेतून झाल्याचे जरी प्राथमिक अंदाजात सांगण्यात आले असले, तरी घटनेचा अधिक तपास विवेकानंद चौक पोलिसठाण्याचे पोलिस करीत आहेत.

Web Title: Student suicide by taking a Hang