तीनदा कॉपी पकडल्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

औरंगाबाद - विद्यापीठाच्या एम.पीएड. परीक्षेत एकाच तासात तीन वेळा कॉपी पकडल्याने सतीश राजू वाघमारे (वय 26, रा. कांचनवाडी) या विद्यार्थ्याने पर्यवेक्षकाला शिवीगाळ, मारहाण करून गोंधळ घातला. त्यानंतर इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना खोकडपुऱ्यातील विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.

वाघमारे हा विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागात एम.पीएड.चे शिक्षण घेत आहे. आज मंगळवारी एम.पीएड.चा प्रथम वर्षाची संख्याशास्त्राची परीक्षा होती. पर्यवेक्षक सुहास गिरी यांनी वाघमारेची कॉपी पकडली व कॉपी न करण्याची सूचना दिली. त्यानंतर वाघमारे व अन्य विद्यार्थी कॉपी करीत असताना पर्यवेक्षकांनी पकडले. त्यांची कानउघाडणी केली. नंतरही वाघमारे समोरच्या विद्यार्थ्याचे पाहून लिहिताना आढळला. त्याला पर्यवेक्षकांनी सरळ बसण्यास सांगितले.

यामुळे चिडलेल्या वाघमारे याने गिरी यांची कॉलर पकडून शिवीगाळ व मारहाण सुरू केली. गोंधळ घातल्यानंतर सतीश हॉलबाहेर पळाला. गच्चीतून खाली उडी घेण्याचा तो प्रयत्न करू लागला. याच वेळी शिक्षकांनी त्याची समजूत काढून माघारी बोलावले. वाघमारेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: student suicide trying cheat