विभागातून 6 विद्यार्थी 'गणिता'त अडकले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

औरंगाबाद - राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण विभागीय मंडळातर्फे दहावीचा बीजगणित हा पेपर मंगळवारी (ता. 14) पार पडला. या पेपरला विभागातून औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी एका, तसेच बीड जिल्ह्यातील परीक्षा केद्रांवरून दोन विद्यार्थ्यांवर कॉपी प्रकरणी कारवाई करण्यात आली.

गेवराईच्या महसूल विभागाच्या पथकाने तालुक्‍यातील महात्मा फुले विद्यालयात दोन विद्यार्थ्यांवर कॉपी प्रकरणी कारवाई केली. सकाळच्या सत्रात बीजगणित या विषयासह अंध, मूक-बधिर, बहुविकलांग, स्वमग्न, अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांसाठी अंकगणित हा पेपर, तसेच दुपारच्या सत्रात सामान्य गणित हे पेपर पार पडले. बीजगणिताच्या पेपरला विभागातून 1 लाख, 86 हजार 527 विद्यार्थी, अंकगणितच्या 138, सामान्य गणितासाठी 3 हजार 219 विद्यार्थी बसले होते.

बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली
बारावीचा सकाळच्या सत्रात कलेचा इतिहास व रसग्रहण, तसेच दुपारच्या सत्रात संरक्षणशास्त्र पेपर पार पडले. यात विभागातून एकाही विद्यार्थ्यांवर कारवाई झाली नसल्याची माहिती विभागीय मंडळातर्फे देण्यात आली. आतापर्यंत दीडशेपेक्षा जास्त कारवाई झाली असून मागील दोन पेपरपासून ही संख्या रोडावल्याचे चित्र आहे. दोन्ही पेपरला 5 हजार 625 विद्यार्थी बसले होते.

Web Title: student suspend in exam cheat