औरंगाबाद- विद्यार्थी काँग्रेस निवडणुक; मतदानासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

अखिल भारतीय विद्यार्थी कॉंग्रेस (NSUI) च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निवडणुकीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सागर साळुंखे हे उमेदवार आहेत. आज(गुरुवार) सकाळी मतदान शांततेत सुरु असताना काही तरुणांनी मतदान केंद्रावर येऊन गोंधळ घालत विद्यार्थ्यांना दमदाटी केली व मतदान बंद पाडले. गोंधळामुळ मतदानासाठी आलेले विद्यार्थी निघुन गेले. 

औरंगाबाद - काँग्रेस पक्षाची विद्यार्थी शाखा असलेल्या विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी सध्या निवडणुक सुरु आहे. यावेळी मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात आज औरंगाबाद येथे मतदान करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. मारहाण करणारे विद्यार्थी काँग्रेसच्या दुसऱ्या गटाचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे. 

अखिल भारतीय विद्यार्थी कॉंग्रेस (NSUI) च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निवडणुकीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सागर साळुंखे हे उमेदवार आहेत. आज(गुरुवार) सकाळी मतदान शांततेत सुरु असताना काही तरुणांनी मतदान केंद्रावर येऊन गोंधळ घालत विद्यार्थ्यांना दमदाटी केली व मतदान बंद पाडले. गोंधळामुळ मतदानासाठी आलेले विद्यार्थी निघुन गेले. 

गोंधळ घालण्यासाठी आलेले तरुण हे प्रतिस्पर्धी उमेदवाराचे कार्यकर्ते असल्याचा आरोप सागर साळुंखे यांनी केला आहे. औरंगाबादमधुन त्या उमेदवारास मतदान होण्याची शक्यता कमी असल्यानेच त्यांनी गोंधळ घालुन मतदान बंद पाडल्याचा आरोपही साळुंखे यांनी केला.

Web Title: students beaten up during nsui election aurangabad