विद्यार्थिनींनी पाण्यासाठी अडवला कुलगुरुंच्या घरासमोरील रस्ता 

अतुल पाटील
गुरुवार, 19 एप्रिल 2018

आज सकाळी मुलींना तोंड धुण्यासाठी, आंघोळीसाठी पाणी नव्हते, त्यातच परिक्षांचा काळ आहे. त्यामुळे मुली संतप्त झाल्या आणि रिकाम्या बकेट घेवून रस्त्यावर उतरल्या.

औरंगाबाद - निवेदने देऊन, आंदोलने करुनदेखील ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थिनींना पाण्यासाठी वनवन करावी लागत असल्याने गुरुवारी (ता. 19) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनींनी कुलगुरुंच्याच घरासमोर रस्ता रोको केला. 

विद्यापीठात पाणीप्रश्न नेहमीचाच झाला आहे. आज सकाळी मुलींना तोंड धुण्यासाठी, आंघोळीसाठी पाणी नव्हते, त्यातच परिक्षांचा काळ आहे. त्यामुळे मुली संतप्त झाल्या आणि रिकाम्या बकेट घेवून रस्त्यावर उतरल्या. त्या थेट कुलगुरु निवासस्थानासमोर जाऊन थांबल्या आणि रास्तारोको सुरु केला. प्रशासनाने काही वेळातच दखल घेत कोंडी फोडली. असे पुन्हा घडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थिनींनी केला. दीक्षा पवार, मोनिका घुगे, श्रद्धा खरात, पूजा टाकनकर, शारदा खाडे, आरती अचलखांब, स्मिता डोंगरे यांच्यासह विद्यार्थिनींची उपस्थिती होती. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Students blocked the road of Vice-Chancellors house for water dispute