विद्यार्थी पडले जर्मनीतील रोबोटच्या प्रेमात

 विद्यार्थी पडले जर्मनीतील रोबोटच्या प्रेमात

आखाडा बाळापूर(जि. हिंगोली): कस्बे धावंडा (ता. कळमनुरी) येथील रहिवासी व सध्या जर्मनी या देशात एका कंपनीमध्ये कार्यरत अभियंता अतिष पतंगे यांनी तयार केलेल्या रोबोटची माहिती कामठा फाटा येथील महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात आली. या वेळी रोबोट सोबत खेळतांना विद्यार्थी दंग झाले होते. विविध रोबोट बघून विद्यार्थी रोबोटच्या प्रेमात पडल्याचे दिसून येत होते.

कसबे धावंडा येथील अतिष पतंगे हे मागील दहा वर्षांपासून जर्मनी येथील एका कंपनीमध्ये कार्यरत आहेत. या कंपनीमधून रॉकेट्स, सॅटेलाईट्सचे छोटे भाग तयार केले जातात. याठिकाणी विविध प्रकारच्या रोबोटचे मॉडेल देखील तयार करण्यात आले आहे. या बद्दल आतिष यांना जर्मन येथे सन्मानिमित्त करण्यात आले होते. श्री. पतंगे हे काही दिवसांपूर्वी गावी आले आहेत. त्यांनी येतानाच माणसाप्रमाणे बोलणारे व चालणारे तसेच इतर विविध प्रकारचे रोबोट आणले आहेत.

रोबोटची विद्यार्थ्यांना दिली माहिती

शनिवारी (ता.१८) कामठा फाटा येथील महात्मा फुले विद्यालयात त्यांनी विद्यार्थ्यांना रोबोटबद्दल माहिती दिली. या वेळी मुख्याध्यापिका सी. आर. रणवीर, शिक्षक एस. जी. खिल्लारे, टी. पी. गुंडे, श्री. शेटे, श्री. धुळे, एन. एस. चव्हाण, जी. बी. नरवाडे यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती. श्री. पतंगे यांनी रोबोटची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.

रोबोट पाहून विद्यार्थी गेले भारावून

जर्मनीमधील डॉक्टर नावाचा रोबोट त्यांनी विद्यार्थ्यांना दाखविला. यासोबतच छोट्या प्रयोगातून मंगळ ग्रहावर पाठविण्यात आलेला रोबोट आणि पृथ्वीवरील शास्त्रज्ञांच्या संवादाचे आदान-प्रदान कसे होते, याचे प्रात्यक्षिकही त्यांनी करून दाखविले. या वेळी त्यांनी नासाने मंगळ ग्रहावर पाठविलेल्या क्युरिऑसिटी या रोबोटचे छोटे मॉडेल देखील दाखविले. जर्मनीमधील रोबोट पाहून शिक्षकांसोबत विद्यार्थी भारावून गेले होते.


खाद्यपदार्थ विक्रीतून खरी कमाईचा आनंद

औंढा नागनाथ : येथील नागेश्वर विद्यालयात शनिवारी (ता.१८) आनंदनगरी कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टाल लावले होते. खाद्यपदार्थ खरेदीसाठी विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गर्दी झाली होती. उदघाटन नगराध्यक्षा विजयमाला मुळे यांच्या हस्‍ते झाले. कार्यक्रमास उपनगराध्यक्षा वच्छलाबाई देशमुख, माजी नगराध्यक्षा दीपाली पाटील, सविता चोंढेकर, प्रद्युम्‍न नागरे, प्राचार्य ज्ञानोबा लांडे, मुख्याध्यापक शेख सय्यद यांची उपस्‍थिती होती.

शाळेच्या प्रांगणात उभारले स्टॉल 

विद्यार्थ्यांनी विविध असे १०० स्टॉल शाळेच्या प्रांगणात उभारले होते. यात सर्वाधिक खाद्यपदार्थांच्या स्‍टॉलचा समावेश होता. यात श्रध्दा भारती हिने वडासांबर, प्रियंका उदगीरकर इडली, ऐश्वर्या शेगुकर बरबटी, कनिष्क मुळे चने व वडापाव, कविता लाड खिचडी, दिव्या देशपाडे मिरची, भजे, संस्कृती लासे मटकी, श्याम गोरे पाणीपुरी, कीर्ती नागरे भेळ, देविदास गोरे पोहे, गायत्री तामसकर ढोकळा, सीताराम मंडलिक इडली, स्नेहल चव्हाण आलू पुरी, मुंजाजी वंजे भेळ अशा खाद्यपदार्थांच्या स्टॉलचा समावेश होता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com