नांदेड : परिक्षा केंद्र चालकास धक्काबुक्की 

red.jpg
red.jpg

नांदेड : परिक्षेत कॉपी करु न दिल्याने संतप्त विद्यार्थ्याने केंद्रप्रमुखास धक्काबुक्की करून शिविगाळ केली. एवढेच नाही तर ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पेनुर (ता. लोहा) येथील परिक्षा केंद्रावर सोमवारी (ता. १४) सकाळी अकरा वाजता घडला.

येथील स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या परिक्षा सुरू आहेत. पेनुर (ता. लोहा) येथील बळीराम पाटील गवते महाविद्यालयात परिक्षा केंद्र आहे. या केंद्रावर परिक्षा देणारा एक विद्यार्थी आपल्या मोबाईलवरून उत्तरपत्रिका सोडवित होता. मुळात त्याला परिक्षा हॉलमध्ये मोबाईल कोणी नेऊ दिला. हा विषय महत्वाचा असून त्याचीही चौकशी व्हायला पाहिजे. सदर विद्यार्थ्याची कॉपी केंद्र प्रमुख डॉ. भरत डोंगरे यांनी पकडली. त्याचा मोबाईल व उत्तरपत्रिका जप्त करून आपल्या कार्यालयाकडे निघाले.

दरम्यान, यावेळी त्या विद्यार्थ्याने त्यांच्या मागे जावून माझा पेपर परत द्या. परंतु पेपर देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्याने डॉ. भरत डोंगरे यांना शिविगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच ‘तु पालमला ये, तुला पाहून घेतो’ असे म्हणून ठार मारण्याची धमकी दिली.

सदर विद्यार्थ्याने शासकिय कामात अडथळा निर्माण केला म्हणून डॉ. भरत डोंगरे रा. शिक्षक कॉलनी पालम (परभणी) यांच्या फिर्यादीवरुन सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सुधाकर आडे करित आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com