परभणीच्या विद्यार्थ्यानी बनवली सौर पॅनलवर चालणारी बॅग बाईक

गणेश पांडे
शनिवार, 16 जून 2018

परभणी : येथील श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र अभियांत्रिकी अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या संशोधक विद्यार्थी विशाल अंबिलवादे याने सौर उर्जेवर चालणारी बॅंग बाईक बनवली आहे.

परभणी : येथील श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र अभियांत्रिकी अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या संशोधक विद्यार्थी विशाल अंबिलवादे याने सौर उर्जेवर चालणारी बॅंग बाईक बनवली आहे.

ही बॅग बाईक आकाराने प्रवाशी बॅंग सारखी असून ती सौर उर्जेवर चालते. तासी 20 किलोमिटर वेगाने धावू शकते. या बॅंग बाईकचे वैशिष्ठ्ये म्हणजे कमी वजनाचे कमी जागेत बसणारी सहज कोठेही नेता येणारी व आवश्यक सामान भरून या बॅग बाईक वर बसून च चालविता येणारी असून प्रदुषण विरहित बॅंग बाईक या विद्यार्थांनी बनवली आहे. 

यंत्र अभियांत्रीक अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेली कविता भगिरथ अंबिलवादे, वैभव पाठक यांनी विशाल अंबिलवादे याला सहकार्य केले.  महाविद्यालयातील या विद्यार्थांच्या मार्गदर्शक प्रा. सुप्रिया शिलवंत व विभाग प्रमुख वाय.बी. जोशी,संचालक आनंद पाथरीकर यांचे सहकार्य लाभले. भविष्यात या बॅंग बाईकचा मोठ्या प्रमाणात उपयोग होवू शकतो. प्रदुषण समस्या व पेट्रोलच्या वाढत्या किमंतीवर उपाय म्हणून ही बॅग बाईक वापरात येऊ शकते. ही प्रायोगिक तत्वावर तयार केलेल्या या बाईकसाठी विद्यार्थांना 10 ते 15 हजार रुपये खर्च आला आहे. या विद्यार्थांना इंटरनॅशनल रिसर्च जरनल ऑफ इंजिरिअरिंग अन्ड टेक्नालॉजी या संशोधन संस्थेकडून प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. आता या बॅग बाईकचे पेटेंट मिळविण्यासाठी महाविद्यालय प्रयत्न करत आहे अशी माहिती संचालक आनंद पाथरीकर यांनी दिली. 
 

Web Title: students from parbhani creates bag bike controlled by solar pannel