विद्यार्थ्यांचे अधिष्ठात्यांच्या कक्षासमोर आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

नागपूर - मेडिकलच्या मुलींच्या वसतिगृह क्रमांक दोनमध्ये विद्यार्थिनींच्या गाड्या पेटवणाऱ्या तरुणाची ओळख पटली. हा तरुण विक्षिप्त असून, मेडिकलचाच विद्यार्थी आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांसोबत चार जण आढळले. पंजाबचा विद्यार्थीवगळता तिघेही वाहन जाळणारे विद्यार्थी मेडिकलच्या वसतिगृहात परतले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दहशत असून, प्रशासनाच्या मदतीसाठी शंभरावर विद्यार्थ्यांनी मेडिकलच्या अधिष्ठाता कक्षासमोर ठाण मांडून अधिष्ठात्यांना निवेदन दिले. 

वाहन जाळणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख सत्यशोधन समितीचा अहवालावरून पटली. वाहन जाळणाऱ्या विद्यार्थ्यावर निष्कासनाची कारवाई होईल. वाहन जाळणाऱ्याकडून सायको किलरच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना धमकी येत आहेत. तीन-चार विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता कक्षात तक्रारही नोंदवली. दरम्यान, वाहन जाळण्याच्या प्रकरणातील काही विद्यार्थी मेडिकलमध्ये परतल्याने इतर विद्यार्थी दहशतीत आहेत. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांची वाहने जाळली आहेत, तेच विद्यार्थी या विक्षिप्त विद्यार्थ्यांच्या रडारवर आहेत. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी विद्यार्थ्यांना धीर दिला. यासंदर्भात पोलिसांनाही कळविण्यात आले. 

वाहने जाळण्याची घटना अनुचित आहे. वाहन जाळणाऱ्याचे मानसिक संतुलन ढासळले आहे. यामुळेच शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. आनंद फुलपाटील यांच्या नेतृत्वात चौकशी समिती गठित केली. अहवाल येताच कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही. आम्ही पोलिसांसोबत सतत संपर्कात असून, सर्व विद्यार्थ्यांना संरक्षण दिले जाईल. 
-डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल. 

Web Title: Students protesting in front of the class