आॅटोत विसरलेले 15 हजारांचे दप्तर मिळाले; शिवाजीनगर पोलिसांची तत्परता

प्रल्हाद कांबळे 
बुधवार, 18 जुलै 2018

15 हजारांची रक्कम असलेले दप्तर ऑटोत विद्यार्थीनी विसरली. मात्र शिवाजीनगर पोलिसांच्या मदतीने तिला दप्तर परत मिळाले.

नांदेड : महाविद्यालयीन विद्यार्थीनीची आॅटोत विसरलेले दप्तर पोलिसांनी तत्परता दाखवत संबंधित आॅटोतून जप्त केले. शिवाजीनगर पोलिसांनी ते परत केल्याने पोलिसांचे विद्यार्थीनीने आभार मानले. 

शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या दिपाली पाचपुते व चैत्रा पाचपुते या दोघींजणी शिवाजीनगर येथील स्टेट बँक आॅफ इंडिया या मुख्य शाखेत बुधवारी (ता. १८) पैसे काढण्यासाठी गेल्या. खात्यातून त्यांनी फीस भरण्यासाठी १५ हजार रुपये काढले व बॅगमध्ये ठेवून नई आबादी येथील मशीदीसमोरून पीपल्स कॉलेजला जाण्यासाठी ॲाटोमध्ये बसल्या परंतु आॅटोतून उतरतांना त्यांची बॅग घाईत विसरली. त्यांनी लगेच शिवाजीनगर पोलिस निरीक्षक मच्छींद्र सुरवसे व उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के यांच्या कार्यालयात जावून ही माहिती सांगितली.

यावेळी निरीक्षक मच्छींद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक करीम पठाण यांनी कर्मचारी शेख ईब्राहीम व मोहन हाके यांना तातडीने पोलिस अधिक्षक कार्यालयात सिसीटीव्ही फुटेज तपासण्यास रवाना केले. त्यावरून ॲटोचा शोध लागला. ॲटो चालकालाही पाठीमागे ठेवलेली बॅग लक्षात आली नाही. त्याला बोलावून घेऊन बॅग ताब्यात घेऊन पोलिसांनी सदर बॅग परत केली. पोलिसांच्या तत्परतेबद्दल व ॲटोचालकाच्या प्रामाणीकतेबद्दल या दोन्ही विद्यार्थीनी आभार व्यक्त मानले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The students who went missing their bag in the Auto have got that bag