देवर्जनच्या भूमिपुत्रांची सातासमुद्रापार भरारी

sachi.jpg
sachi.jpg

उदगीर  : देवर्जन (ता. उदगीर) येथील भुमीपुत्र व अमेरिकेत कम्प्युटर इंजिनीरिंगचे शिक्षण घेतलेला इंजिनीयर सचिन परमहर्ष रोडगे हा अमेरिकेतील अमेझॉन या नामांकित कंपनीमध्ये इंजिनीयर म्हणून नुकताच रुजू झाला आहे.
सचिनचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उदगीरच्या शामलाल स्मारक विद्यालयात झाले. त्याचे बारावी शिक्षण लातूरच्या राजश्री शाहू महाविद्यालयात झाले. बीटेकची पदवी मुंबई येथे तर पदव्युत्तर पदवीचे शिक्षण हे अमेरिकेमध्ये पूर्ण झाले.

दरम्यान, वडील परमहर्ष यांनी सोळा वर्षे भारतीय सैन्य दलात काम केले त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा दुसरा मुलगा गोवा येथे पदवीधर म्हणून नोकरी करतो.

जगामध्ये नामांकित असलेल्या अमेझॉन कंपनीत देवर्जनचा भूमिपुत्राची निवड झाल्याने देवर्जन गावामध्ये जल्लोष करण्यात आला. अमेरिकेतच कंप्यूटर इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांना अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या अमेझॉन कंपनीतच नोकरीची संधी मिळाली आहे. सचिन रोडगे याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. यांच्या या यशाबद्दल त्यांचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे यांनी सत्कार केला. यावेळी निर्मला वाडकर, रामेश्वर वाडकर, परमहर्ष रोडगे आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com