विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचविण्यात यश

संकेत कुलकर्णी
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : सातारा परिसरातील एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्याचे प्राण एका रहिवासी महिलेच्या दक्षतेमुळे वाचले. महापालिका कर्मचाऱ्यांनी कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढून जंगलात सोडून दिले.

औरंगाबाद : सातारा परिसरातील एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्याचे प्राण एका रहिवासी महिलेच्या दक्षतेमुळे वाचले. महापालिका कर्मचाऱ्यांनी कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढून जंगलात सोडून दिले.

सातारा वॉर्डातील एका विहिरीत कोल्हा पडल्याचे परिसरातील नागरिक सुनीता घोडके यांच्या निदर्शनास आले. राजू घोडके यांनी नगरसेवक सायली जमादार यांच्या मदतीने अग्निशमन विभागाला ही बाब कळवली. अग्निशमन दलाचे जवान मुनवर शेख, विनोद कदम, हरिभाऊ घुगे, वाहन चालक अशोक खोतकर आणि महापालिका कर्मचारी आप्पासाहेब गायकवाड, प्रसाद शिंदे, महेंद्र खोतकर, दिनेश मुंगसे, परमेश्वर साळुंके, ईसाक शेख, विजय कोथमिरे, जगदीश सलामबाद यांनी मोठ्या परिश्रमाने विहिरीत उतरून जाळे टाकून कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर जंगलात सोडले. हा कोल्हा दोन ते तीन दिवसांपासून विहिरीत पडून होता, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

Web Title: Success in Saving a Fox that was dug in the well