esakal | Success story: "मोहगणी" च्या लागवडीतून आर्थिक समृद्धीची दिशा; एकरी किमान २५ लाख नफ्याची हमी

बोलून बातमी शोधा

mohgani}

एकरी किमान २५ लाख नफ्याची हमी ; लागवड वाढीसाठी रोजगार हमी योजनेतुन अडीच लाख देण्याचा सरकारचा निर्णय

Success story: "मोहगणी" च्या लागवडीतून आर्थिक समृद्धीची दिशा; एकरी किमान २५ लाख नफ्याची हमी
sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद): पारंपारिक शेती पद्धतीतून मिळणारे उत्पन्न कमी झाल्याने आधुनिक, नाविण्यपूर्ण शेती करण्याचा प्रयत्न तरूण शेतकऱ्यांकडून होतो आहे. तालुक्यातील कोराळ येथील उपक्रमशिल शेतकरी परमेश्वर जाधव यांनी मोहगणी झाडांची लागवड करून आर्थिक समृद्धीचा मार्ग स्विकारला आहे. दरम्यान कोल्हापूरच्या क्रॉपसिटी ऍग्रोव्हेट कंपनीशी करार करुन रोप लागवडीच्या तीन वर्षानंतर एकरी पन्नास हजाराची अनामत रक्कम मिळवली आहे.

शेती व्यवसाय निसर्गावर अवलंबून असतो, अधून - मधून बसणारा फटका शेती व्यवसायाला मारक ठरतो आहे. सोबतीला मराठवाड्यात दुष्काळाची गडद छाया असतेच. त्यामुळे पाण्याची उपलब्धता कमी असल्याने शेतकऱ्यांना पिक पद्धतीत बदल करावा लागतो आहे. पारंपारिक शेती व्यवसायातून बाहेर येऊन काही तरूण शेतकरी आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करत आहेत. भौतिक सुविधांसाठी सागवण लाकडाच्या फर्निचरची मोठी मागणी असते, अशा पद्धतीच्या मोहगणी झाडाच्या लाकडाचा वापर फर्निचरसाठी केला जातोय.

कोणी न्याय देईल का? चक्क शेतरस्ता १४ शेतकऱ्यांनी मिळून केला गायब, मेहनतीने...

कोराळचे शेतकरी श्री. जाधव यांनी कोल्हापूरच्या क्रॉपसिटी ऍग्रोव्हेट प्रा.लि. कंपनीशी बारा वर्षांचा करार केला आहे. प्रारंभी एक एकरमध्ये ५२ हजार खर्च करून पाचशे मोहगणीच्या रोपाची लागवड केली. ती झाडे आता साडे चार वर्षांची झाली आहेत. दुसऱ्या एक एकरमध्ये लागवड केलेल्या मोहगणीला तीन वर्षे झाली. दोन एकर लागवड क्षेत्राशी कंपनीशी करार झाला आहे. लागवडीच्या तीन वर्षानंतर कंपनीकडून एकरी पन्नास हजाराची अनामत रक्कम दिली जाते, त्याची एक लाखाची रक्कम एक महिन्यापूर्वी श्री. जाधव यांना मिळाली आहे. साधारणतः सात ते बारा वर्षापर्यंत झाडाच्या लाकडाची विक्री होईपर्यंत ही अनामत रक्कम दिली जाते. जेंव्हा लाकडाच्या विक्रीतून मिळणाऱ्या रक्कमेतून अनामत रक्कम कंपनी घेते.

"कार्बन क्रेडीट" मधून पन्नास हजार-
मोहगणीची लागवडीतून शासनाच्या "कार्बन क्रेडीट" योजनेतून लागवडीच्या पाच वर्षापासुन झाडाची विक्री होईपर्यंत प्रत्येक वर्षाला एकरी पन्नास हजाराचे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. यासाठी कंपनी लागवड क्षेत्राचे अॅडिट करते. पर्यावरणासाठी पूरक म्हणून हे अनुदान दिले जाते.

असा मिळतो फायदा
तीन वर्षांपर्यंत शेतकऱ्यांना स्वतः खर्च करावा लागतो, त्यासाठी एकरी दीड लाख खर्च येतो. झाडावर रोगराईचा फटका बसत नाही. पाच वर्षानंतर कार्बन क्रेडीटचे मिळणारे पन्नास हजार. एका झाडातून साधारणतः २० घनफुट लाकुड मिळणे अपेक्षित असते. किमान पाचशे रुपये घटफुटाचा दर धरला तर एका झाड दहा हजाराचे उत्पन्न देते. उत्पन्नाचा कालावधी दिर्घ असला तरी मिळणारा नफा मोठा आहे. दरम्यान शासनाने नवीन आदेशानुसार मोहगणी लागवड ते जोपासना यासाठी तीन वर्षापर्यंत अडीच लाख रुपये रोजगार हमी योजनेतून देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनातली उधळपट्टी, बीडमध्ये सव्वासहा कोटींचा लखलखाट

" मोहगणी लागवडीचे धाडस केले. कंपनीच्या सहकार्यामुळे प्रोत्साहन मिळाले. झाडाची जोपासना चांगली केल्याने येणाऱ्या काळात दोन एकर क्षेत्रातुन मिळणारे उत्पन्न पन्नास लाखाहुन अधिक असेल. कंपनीची अनामत रक्कम, टक्केवारी वजा जाता एकरी किमान २५ लाखाची अपेक्षा आहे. मोहगणी लागवडीविषयी जागृती केल्याने परिसरातील तीन शेतकऱ्यांनी लागवड केली. मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी भेटी देऊन माहिती घेतली आहे. - परमेश्वर जाधव, शेतकरी कोराळ 
 

(edited by- pramod sarawale)