Success Story : सर्व सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने जागतिक दर्जाची मेरी क्युरी शिष्यवृत्ती मिळवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Success Story farmer son wins Marie Curie scholarship education

Success Story : सर्व सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने जागतिक दर्जाची मेरी क्युरी शिष्यवृत्ती मिळवली

जेवळी : रुद्रवाडी (ता. लोहारा जि. धाराशिव) येथील एक सर्व सामान्य शेतकऱ्याचा मुलगा डॉ. नागनाथ यादव मोरे हे जिद्द, चिकाटी, आणि परिश्रमाच्या जोरावर जागतिक दर्जाचे मेरी क्युरी शिष्यवृत्ती (दोन कोटी २५ लक्ष रुपय) मिळवत संशोधन पूर्ण केले असून आता इंग्लंड येथील युरोपियन्स कंपनीत वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले आहेत.

शुक्रवारी (ता.२४) या प्रतित यश शास्त्रज्ञांचं जिल्हा परिषद शाळा व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. प्रखर इच्छाशक्ती व परिश्रमाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून एका खेड्यातील सर्व सामान्य शेतकऱ्यांना मुलगा हा यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो हे लोहारा तालुक्यातील जवळपास सातशे लोकसंख्येच्या रुद्रवाडी या खेड्यातील जिल्हा परिषदे शाळेचा विद्यार्थी डॉ. नागनाथ यादव मोरे यांनी दाखवून दिला आहे.

डॉ. नागनाथ मोरे हे एक सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती, त्यांना बालपणापासूनच संघर्षला तोंड द्यावे लागले. त्यांच प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण हे लातुर येथील जनकल्याण निवासी विद्यालयात झाले. बारावी हे दयानंद सायन्स कॉलेज लातूर येथे झाले असून उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून पदवी मिळवली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून ऑरगॅनिक केमिस्ट्री मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

यानंतर नेट परिक्षत संपूर्ण देशातून २४ वा रँक मिळाला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिचार्ज पुणे येथून रसायन शास्त्रात पीएचडी प्राप्त केली. इस्राईल देशात या देशांतील विद्यापीठाकडून मिळालेल्या कआईटमन शिष्यवृत्तीतून दोन वर्ष संशोधन पूर्ण केले.पुढील संशोधनासाठी मेरी क्युरी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला.

पहिली महिला नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ मेरी क्युरी यांच्या नावाने जागतिक दर्जाच्या नव्या संशोधकांना शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती प्रतिष्ठेचे मानले जाते. २०२० ते २०२२ याकाळात डॉ. नागनाथ मोरे यांना रसायनशास्त्रातील औषध निर्मितील संशोधनासाठी दोन कोटी पंचवीस लाख रुपये शिष्यवृत्ती मिळाली आहे.

यातून बर्मिंगहॅम विद्यापीठातून संशोधन पूर्ण केले असून आता इंग्लंड येथील युरोफियन्स या औषध कंपनीमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाला आहे. त्यांना या कंपनीने वार्षिक पॅकेज म्हणून ६० लक्ष रुपये देत आहे. यासाठी त्यांना भारतात डॉ राजेश पाटील, डॉ जोगेंद्र भिसेन, इस्त्राईलमध्ये बोरॉन पापो तर इंग्लंडमध्ये पॉल डेविस यांचं मार्गदर्शन लाभले आहे.

शुक्रवारी (ता.२४) गावी परतल्यानंतर या प्रतित यश शास्त्रज्ञांचं जिल्हा परिषद शाळा व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. यावेळी शिवबसव प्रतिष्टानचे अध्यक्ष महादेव कारभारी, ग्रामपंचायत सदस्य राम मोरे, शिक्षक गोविंद घारगे, नागेश शिंदे, दत्तात्रय शिंदे संजय माने, संजय हराळे आदींची उपस्थिती होती

डॉ. नागनाथ यादव मोरे, युवा शास्त्रज्

  • इच्छाशक्ती व योग्य मार्गदर्शन मिळाले तर खेड्यातील मुलगाही यशस्वी होऊ शकतो. परदेशात उच्च शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती आहेत त्याची योग्य माहिती घेतली पाहिजे

टॅग्स :education