पोलिसाचा असाही प्रामाणीकपणा

फोटो
फोटो

नांदेड : कर्तव्य बजावून आपल्या घराकडे परत जात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यास शिवाजीनगर मशिदीसमोर शनिवारी (ता. २५) सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर एक पाकीट सापडले. त्यांनी ते पॉकेट उघडून बघीतले असता त्यात सात हजार ३१० रुपये व दोन एटीएम कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि आधार कार्ड आढळून आले. ते पॉकेट घेऊन थेट शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जमा केले. शिवाजीनगर पोलिसांनी संबंधीत व्यक्तीला शोधून आणून त्याच्या स्वाधीन केले. पोलिस विष्णु मुंडे यांच्या या प्रामाणीकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

पोलिस ठाण्याची व कोर्टाची पायरी ओलांडण्याची वेळ दुष्मणावर येवू नये असे म्हणतात. त्याचे कारणही खरे आहे. एखाद्या किरकोळ कारणावरून पोलिस ठाण्यात गेलेल्या व्यक्तीचा पोलिसांकडून पानउतारा होत असतो. काही पोलिसांकडून न्याय मागण्यासाठी आलेल्यांचा अनेकवेळा अपमान करण्यात येतो. कुठलेही काम चिरीमीरीशिवाय केल्या जात नाही. पैसे नसतील त्याबदल्यात कुठलीतरी वस्तु किंवा पदार्थ पोलिसांच्या हातावर ठेवला तरच आपणे काम होते असा अनेकांचा समज आहे. तशा वृत्तीचे पोलिस आजही समाजात उजळमाथ्याने फिरतात. समाजही त्याच लोकांचा उदोउदो करत असतो. अशा प्रवृत्तीच्या पोलिसांमुळे अख्खे पोलिस दल बदनाम ठरत असते. 

लहानपणापासूनच संस्कार रक्तात लागतात

मात्र आजही आई- वडिलांचा सुसंस्कार व कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणीकपणा असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या पठडीमध्ये तयार झालेले काही पोलिस समाजाला दिशा देण्याचे काम करतात. असाच एक कौतूकास्पद प्रकार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात घडला. वजिराबाद चौकात लॉकडाऊनचा बंदोबस्त करुन पोलिस कर्मचारी विष्णू मुंडे (बन. १८२५) हे आपल्या घराकडे दुचाकीवरून जात होते. यावेळी त्यांना शिवाजीनगर मशिदीसमोर रस्त्यावर एक पाकीट पडलेले दिसले. त्यांनी लगेच आपली दुचाकी थांबविली. पाकीट हातात घेऊन पाहतात तर त्यात सात हजार रुपये व काही महत्वाचे कार्ड त्यांना दिसले. त्यांनी ते पाकीट सोबत घेऊन शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनंत नरुटे यांच्या स्वाधीन केले. 

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची कौतुकाची थाप

श्री. नरुटे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे, फौजदार प्रकाश उर्फ सोपान थोरवे यांनी पाकीटमधील कार्डवर असलेल्या व्यक्तीचा शोध सुरु केला. तो शहराच्या गोलचाळ, एनटीसी मील परिसर येथील आसिफ अहमद  (वय २५) असल्याचे समजले. पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला. त्यांनीही आपले पाकीट हरवल्याचे सांगून सर्व कार्ड व रक्कमेचे विवरण सांगितले. पोलिसांना खात्री पटल्यानंतर आसिफ अहमद याला पोलिस ठाण्यात बोलावून विष्णू मुंडे यांच्या हस्ते त्यांचे पाकीट दिले. यावेळी पोलिसांचे आसिफ यांनी कौतुक केले. पवित्र रमजान महिण्यात केलेले हे काम अनेक पोलिसांंना प्रोत्साहन देणारे ठरले आहे. पोलिस अधिक्षक विजकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के आणि पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांनी श्री. मुंडे यांचे अभिनंदन केले.       

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com