संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील रेल्वेगेट बंद होऊ देणार नाही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 डिसेंबर 2016

सुधीर मुनगंटीवार यांचे मेट्रो औरंगाबाद असोसिएशनला आश्‍वासन

औरंगाबाद: संग्रामनगर उड्डाण पुलाजवळ असलेल्या रेल्वे गेट (क्र. एल. सी.54) येथे मंजुर असलेला भुयारी मार्ग करण्यासाठी पुढाकर घेणार असून मार्ग तयार होईपर्यंत रेल्वेगेट बंद होऊ देणार नाही, असे आश्‍वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी (ता.दहा) मेट्रो औरंगाबाद असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

संग्रामनगर देवानगरी रेल्वे गेटजवळ मंजूर झालेल्या भुयारी मार्गाचे काम सुरु करण्यात यावे, या मागणीसाठी दोन डिसेंबरपासून मेट्रो औरंगाबाद असोसिएशन व नागरिकांतर्फे आंदोलन करण्यात येत आहेत. या विषयी मेट्रो औरंगाबाद असोसिएशनचे पदाधिकारी, अध्यक्ष श्रीमंत गोंडे पाटील व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन देऊन या विषयात लक्ष घालण्याची मागणी केली. या विषयी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोलणी करून लवकर तोडगा काढू, रेल्वे गेट बंद करू देणार नसल्याचेही आश्‍वासन यावेळी श्री. मुनगंटीगवार यांनी दिले.

या मार्गाविषयी 16 ऑगस्टला खासदार चंद्रकांत खैरे यांनी रेल्वेचे नांदेड विभागाचे डीआरएम ए.के.सिन्हा यांच्यासोबत बैठक घेतली होती. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी या गेटला भेट देऊन पाच कोटी 50 लाख रुपये या भुयारी मार्गासाठी मंजूर केले होते. मात्र, आता निधी नसल्याचे सांगत रस्ते विकास महामंडळ या मार्गाचा विषय टाळत आहे. यामूळे आंदोलन करण्यात येत असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत गोंडे पाटील यांनी श्री. मुनगंटीवार यांना सांगितले.

दरम्यान, या संदर्भात शुक्रवारी (ता.नऊ) राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. या प्रश्‍नाविषयी उडवा-उडवीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांना मेट्रो औरंगाबाद असोसिएशनतर्फे घेराओ घालण्यात आला होता.

Web Title: sudhir mungantiwar's statement on railway gate