साखरेचे भाव घसरल्याने कारखान्यांचे अर्थकारण बिघडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

शेंदूरवादा - यावर्षीच्या गळीत हंगामाच्या सुरवातीला साखरेचे भाव ३ हजार ५०० रुपये होते; मात्र त्यामध्ये आठशे ते हजार रुपये प्रतिक्विंटल घसरण झाल्यामुळे सध्या साखरेचे भाव २ हजार ६०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. सतत भाव घसरल्याने साखर कारखानदारीचे अर्थकारणच बिघडून गेले आहे.

केंद्र सरकारने साखरेची केलेली आयात आणि कारखान्यांच्या साखरसाठ्यावर व इतर लादलेले निर्बंध यामुळे साखरेच्या भावात घसरण झाली आहे.

जिल्ह्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांचे गळीत हंगाम आटोपले असून कारखाने बंद झाले आहेत. मात्र याच काळात साखर दर आणि मूल्यांकन कमी झाल्याने कारखान्यांची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने सरकारने ऊसदराच्या फरकापोटी उत्पादकांना प्रतिटन ५५ रुपये थेट अनुदानाची घोषणा केली आहे.

पुढील हंगाम कसोटीचा
यावर्षीपेक्षा पुढील हंगामात आणखी साखर उत्पादन वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे देशात अतिरिक्त साखर साठा झाल्यास त्याचा साखर दरावर विपरीत परिणाम होणार आहे. केंद्र व राज्य शासनाने याबाबत वेळीच उपाययोजना न केल्यास देशातील संपूर्ण साखर उद्योग अडचणीत येऊ शकतो. त्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करून वेळीच योग्य निर्णय घेतल्यास साखर उद्योग आर्थिक संकटातून बाहेर येण्यास मदत होईल; अन्यथा आगामी हंगामातील ‘एफआरपी’वरही परिणाम होणार आहे. 

शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेता मुक्‍तेश्वर साखर कारखान्याने आतापर्यंत ऊस पुरवठा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे पैसे खात्यात जमा केले असून साखरेच्या भावातील घसरणीच्या सातत्यामुळे कारखान्याची आर्थिक परिस्थिती खालावली असून तोडणी वाहतूक ठेकेदार व इतर ठेकेदारांची बिले देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- ए. बी. पटारे, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुक्‍तेश्‍वर कारखाना

Web Title: sugar rate factory economics colapse

टॅग्स