ऊसतोडीसाठी सोडून निघालो घरदार...

बाबासाहेब गोंटे
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

अंबड - तालुक्‍यात दुष्काळामुळे शेतीची कामे न राहिल्याने अनेकांच्या हातात विळ्याऐवजी आता कोयते दिसू लागले आहेत. ऊसतोडीसाठी सध्या शेतमजूरही साखर कारखाना क्षेत्राकडे स्थलांतर करीत आहेत. 

दुष्काळाची दाहता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. निर्सगाचे दुष्टचक्र सध्या फिरत आहे. सतत निसर्गाचा लहरीपणा आड येत आहे. खरीप पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. रब्बीचा आता कोणताही भरवसा राहिलेला नाही. पिण्यासाठी गावात पाण्याचा प्रश्‍न बिकट होण्यास सुरवात झाली आहे. खाण्यासाठी शेतात धान्य पिकत नाही. 

पावसाअभावी ज्वारी, हरबरा, गव्हाची पेर करणे शक्‍य होत नाही. यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांवर घरदार सोडण्याची वेळ आली आहे. दुष्काळाचे गडद संकट पाठीशी लागले आहे. यामुळे रोजगाराच्या शोधात गाव, वाडी, वस्ती, तांडे ओस पडत चालले आहे. 

अनेकांनी घराला कुलूप लावून आपल्या कुंटुंबातील सदस्यांबरोबर साखर कारखान्याच्या दिशेला जात आहेत. ऊसतोड मुकादमासोबत ऊसतोडीचा करार करून ऊसतोडीच्या कामाला बैलगाडी घेऊन शेतमजूर रवाना होत आहेत.

गावात हाताला कामधंदा नाही. शेतात यंदा पावसाअभावी पीकपाणी पिकले नाही. खरीप हंगामात पावसाने धोका दिला. रब्बीची शाश्वती राहिली नाही. यामुळे लेकराबाळाचे पोट भरण्यासाठी ऊसतोडीच्या कामाशिवाय पर्याय उरलेला नाही.
- कचरू मोहिते, शेतमजूर, अंबड

Web Title: Sugarcane Cutting Worker Home Work Migration