'कारखान्यांनी 265 जातीचा ऊस गाळपास न्यावा'

कमलेश जाब्रस
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

रास्ता रोको केल्यामुळे पात्रुड - माजलगांव, परभणी - माजलगांव रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. यावेळी कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. काही काळ वाहतुक ठप्प झाली होती.

माजलगाव (जि. बीड) : तालुक्यात तीन साखर कारखाने आहेत. सदरील कारखाने 265 जातीचा ऊस गाळपास नेत नाहीत त्यामुळे हा ऊस गाळपास न्यावा यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग परभणी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. 

मागील दोन वर्षांपूर्वी कारखानदारांनी बैठक घेउन 265 जातीचा उस गाळपास घेतला जाणार नाही असे ठरवले होते. त्यामुळे शेतक-यांनी साखर आयुक्त पुणे येथे तक्रार करत साखर सहसंचालक औरंगाबाद यांना घेरोओ घातला. याची दखल घेत 265 जातीचा उस गाळपास न्यावा असे आदेश कारखन्यास दिले असतांनाही आता कारखानदार 265 जातीच्या उसाला ना ना करत आहेत. त्यामुळे 265 जातीचा उस गाळपास न्यावा, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, रोजगार हमीची कामे त्वरीत सुरू करावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी यासह विवीध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

रास्ता रोको केल्यामुळे पात्रुड - माजलगांव, परभणी - माजलगांव रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. यावेळी कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. काही काळ वाहतुक ठप्प झाली होती.

Web Title: sugarcane farmer agitation in Beed