थकीत उस देयकप्रश्नी ‘जयमहेश’च्या कर्मचाऱ्यांना कोंडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

एका शेतकऱ्याने आत्महत्येचाही प्रयत्न केला. जयमहेश कारखान्याने गेल्या हंगामात गाळप केलेल्या ऊसापैकी 10 जानेवारी पर्यंतच्या रकमा शेतकऱ्यांना दिल्या आहेत.

माजलगाव (जि. बीड) : तालुक्यातील पवारवाडी येथील खासगी तत्वारील जय महेश साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊसाचे देयक थकविल्याप्रकरणी संतप्त शेतकऱ्यांनी कारखाना कर्मचाऱ्यांना दिड तास कोंडून ठेवल्याची घटना सोमवारी (ता. 6) दुपारी घडली.

यावेळी एका शेतकऱ्याने आत्महत्येचाही प्रयत्न केला. जयमहेश कारखान्याने गेल्या हंगामात गाळप केलेल्या ऊसापैकी 10 जानेवारी पर्यंतच्या रकमा शेतकऱ्यांना दिल्या आहेत. त्यानंतर कारखान्याला गाळपासाठी ऊस दिलेल्या शेतकऱ्यांचे देयक कारखान्याने थकविले आहे. थकित देयकासाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा अर्ज, विनंत्या आणि पाठपुरावा करुनही कारखान्याने याची दखल घेतली नाही. शेतकऱ्यांनी कारखान्याचे मुख्यालय असलेल्या हैदराबाद येथेही आंदोलने केली. दरम्यान, सोमवारी संपत्त शेतकऱ्यांनी मुख्य प्रवेश व्दार बंद करुन कारखान्यातील अधिकारी - कर्मचाऱ्यांना दिड तास कोंडून ठेवले. याच वेळी बाबू भागूजी गवळी (वय ५८, रा. देवगाव, ता. वडवणी) या शेतकऱ्याने विषारी बुकटी प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यास रोखल्याने अनर्थ टळला.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: sugarcane financial transaction issue in sugarcane factory at beed majalgaon