ऊस गाळपात उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उसाचे गाळप मोठ्या प्रमाणावर होत असून, सध्या नांदेड विभागामध्ये सर्वाधिक गाळप करून या जिल्ह्याने अव्वल क्रमांक गाठला आहे. 

सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ कारखान्यांनी २५ लाख ७१ हजार २३१ मेट्रिक टन ऊस गाळप केला असून, त्यातून २५ लाख ११ हजार १६६ क्विंटल साखरेचे उत्पादन काढले आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा सरासरी उतारा ९.७७ टक्के इतकाच निघाला आहे. साखर उतारा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वांत कमी असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा उसाचे क्षेत्र वाढले. जवळपास पन्नास हजार हेक्‍टर ऐवढ क्षेत्र निर्माण झाले होते; पण निसर्गाची अवकृपा झाल्याने शेतकऱ्यांसह कारखानदारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अनेक कारखान्यांनी नव्याने चिमण्या पेटविल्या असल्या तरी अपेक्षित उतारा मात्र मिळत नसल्याचे दिसून येत आहे. पाण्याचे दुर्भिक्ष झाल्याने ऊस वाळून जात आहे, तर कारखाने ऊस घेऊन जात नसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढत आहेत.

Web Title: Sugarcane Galap Osmanabad District Topper in District