राज्यात सात लाख हेक्‍टर उसाला पाटानेच पाणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

लातूर - राज्यात अनेक ठिकाणी पिण्याचे पाणीही ऊस पळवून नेत आहे. यातून अनेक जिल्ह्यांत दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. राज्यात सध्या सात लाख हेक्‍टर क्षेत्रावरील उसाला पाटानेच पाणी दिले जात आहे. एका हंगामात एक हेक्‍टर ऊस अडीच कोटी लिटर पाणी पीत आहे. आता राज्य शासननेही उसासाठी सूक्ष्म सिंचन योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यातून येत्या दोन वर्षांत तीन लाख हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस सूक्ष्म सिंचनाखाली आणला जाणार आहे.राज्यात सध्या उसाचे क्षेत्र ९.४२ लाख हेक्‍टर आहे. या क्षेत्रापैकी २.२५ लाख क्षेत्रावरीलच ऊस सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यात आतापर्यंत यश आले आहे.

लातूर - राज्यात अनेक ठिकाणी पिण्याचे पाणीही ऊस पळवून नेत आहे. यातून अनेक जिल्ह्यांत दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. राज्यात सध्या सात लाख हेक्‍टर क्षेत्रावरील उसाला पाटानेच पाणी दिले जात आहे. एका हंगामात एक हेक्‍टर ऊस अडीच कोटी लिटर पाणी पीत आहे. आता राज्य शासननेही उसासाठी सूक्ष्म सिंचन योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यातून येत्या दोन वर्षांत तीन लाख हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस सूक्ष्म सिंचनाखाली आणला जाणार आहे.राज्यात सध्या उसाचे क्षेत्र ९.४२ लाख हेक्‍टर आहे. या क्षेत्रापैकी २.२५ लाख क्षेत्रावरीलच ऊस सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यात आतापर्यंत यश आले आहे. सध्या राज्यात ७.१८ लाख हेक्‍टर उसाला आजही पाटानेच पाणी दिले जात आहे. 

Web Title: Sugarcane water with seven lakh hectares in maharashtra