ऊसतोड मजूरांसाठी ऐन दिवाळीत पुन्हा धस ऊसाच्या फडात

suresh dhas.jpg
suresh dhas.jpg

बीड : बीड जिल्हा ऊसतोड मजूरांचा जिल्हा तर पश्चिम महाराष्ट्र सहकाराची पंढरी. जिल्ह्यातील सर्वाधिक ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांवर असल्याने भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा या मजूरांच्या प्रश्नांवर पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांकडे कुच केले आहे. इकडे विविध पक्षांच्या नेत्यांची दिवाळी सुरु असताना सुरेश धस मात्र कारखान्यांवर मजूरांचे मेळावे घेत आहेत.


मधल्या काळात ऊसतोड मजूरांच्या भाववाढीसाठी कोयता बंद आंदोलन झाले. आंदोलनात विविध संघटना उतरल्या. भाजपने आंदोलनाची धुरा भाजप आमदार सुरेश धसांच्या खांद्यावर सोपविली. धसांनीही ही धुरा लिलया पेलत राज्यभर आंदोलना निमित्त मेळावे, सभा घेत दिडशे टक्के भाववाढीसाठी रान पेटविले. यावेळी मजूर परतत असताना त्यांच्या प्रश्नांसाठी धाऊन जाणाऱ्या सुरेश धस यांच्यावर विविध गुन्हे नोंद दाखल झाले. 

दरम्यान, जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासह साखर संघ, विविध खात्यांचे मंत्री आणि संघटनांच्या बैठकीत १४ टक्के भाववाढ मिळाली. मात्र, भाववाढ मान्य नसल्याचे सांगत धसांनी सभात्याग केला आणि पुन्हा जानेवारीत कोयता बंदचा इशारा दिला. दरम्यान, भाजपमधील प्रमुख नेत्यांसह विविध संघटनांनी भाववाढ मान्य केली आहे. मात्र, सुरेश धसांनी किमान ८५ टक्के भाववाढीसह मजूरांना स्वच्छतागृह, विमा आदी मागण्यांसाठी जानेवारीतल्या आंदोलनासाठी जागर यात्रा सुरु केली आहे.

शुक्रवारी (ता. १३) धसांनी विघ्नहर कारखाना, भीमाशंकर कारखाना, पराग कारखाना, सोमेश्वर कारखाना, साखरवाडी कारखाना, माळेगाव कारखाना, 
भवानीनगर कारखाना, घोडगंगा तर शनिवारी (ता. १४) सह्याद्री शुगर, कृष्णा सहकारी साखर कारखाना, वाटेगाव कारखाना, इस्लापुर कारखाना, वाळवा कारखाना, सरवदे कारखाना, क्रांतीकुंडल कारखाना, सोनहीरा या कारखान्यांच्या फड व थळांच्या ठिकाणी भेट देत मजूरांचे मेळावे घेतल. मजूरांनीही धसांचे जंगी स्वागत केले. विशेष म्हणजे पवारांच्या बारामती आणि काटेवाडीपर्यंत धसांनी कुच केली आहे. नेते दिवाळी साजरी करत असताना सुरेश धस मात्र मजूरांसाठी पुन्हा एकदा ऊसाच्या फडात पोचले आहेत.

महिला मजूरांची कुचंबना आणि भाववाढ

कारखान्यांवर स्वच्छतागृह नसल्याने महिला मजूरांची कुचंबना होते. मागच्या आघाडी सरकारच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांनी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार पटकावले. पुणे जिल्ह्यातील केवळ एक कारखाना वगळता कोणत्याच कारखान्यांवर स्वच्छतागृह नसताना पुरस्कारासाठी शिफारस करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. स्वच्छतागृह उभारुन महिला मजूरांची कुचंबना थांबवावी आणि ८५ टक्के भाववाढ द्यावी, अशी प्रमुख मागणी करत धसांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

(संपादन-प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com