आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरीत प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

बीड - आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन होण्यासाठी शासकीय सेवेतील गट "क' आणि "ड'च्या जागा सरळसेवेने भरताना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

एका जागेसाठी दोन उमेदवारांना समसमान गुण असतील, तर अशा वेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्राधान्य द्यावे आणि त्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य नसतील, तर वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवाराला प्राधान्य द्यावे, असे धोरणही सरकारने स्वीकारले आहे.

शासकीय सेवेतील गट "क' आणि "ड'च्या जागा सरळसेवेने भरण्यासंदर्भातील आतापर्यंतचे वेगवेगळे निर्णय रद्द करून सरकारने सरळसेवा भरतीचे नवीन धोरण जाहीर केले असून, तसा आदेश बुधवारी (ता. 13) काढला आहे. गट "क' आणि "ड'च्या जागांसाठी भरती केवळ लेखी परीक्षेच्या गुणांवरच राहणार आहे. त्यासाठी कुठलीही मुलाखत आता घेतली जाणार नाही.

Web Title: suicide affected farmer son service state government