पत्नी व सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

पत्नी व सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

केज (बीड) : तालुक्यातील सारूळ येथील राजुद्दीन मैनोद्दीन सय्यद (वय-34वर्ष) याने रविवार (ता.17) रोजी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महात्या केल्याची घटना घडली आहे. मरण पावलेल्या राजुद्दीनच्या वडीलांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मयताची पत्नी व सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील सारुळ येथील राजुद्दीन  सय्यद हा शेतमजुरीचे काम गावातच करत कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. मात्र त्याची पत्नी व सासूचा खेड्यात शेतीत मोलमजुरी कशाला करता; शहरात चांगला कामधंदा करा तगादा लावत होत्या. जावई असून देखील सतत आपमानास्पद वागणूक देत असत. हा आपमान सहण करत पत्नी व सासूच्या सांगण्यानुसार केज शहरात राहण्यासाठी आला. तरीही पुन्हा सासु व पत्नीच्या माहेर असलेल्या लातूरला चला म्हणून तगादा लावला जात होता. यातून या तिघांचे जोरदार भांडण होत असे. यावरच न थांबता राजुद्दीनला सासू व पत्नीने मारहाण करत त्याच्यावर न्यायालयात केस करण्याची धमकी दिली जात होती.

वडील मुलास केज येथे भेटायला गेले तेव्हा देखील त्यांच्या घरी मुलाशी पत्नी व सासूची भांडणे सुरू होते. यावेळी त्यांनी सर्वांना समजून सांगितले परंतू त्या दोघी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. राजुद्दीनचा मोबाईल हिसकावून घेतला. वाद विकोपाला जात असल्याचे पाहून मयत व त्याच्या वडीलांनी केज पोलीस ठाण्यात पत्नी व सासू या दोघी विरोधात  सतत त्रास देतात असल्याची तक्रार दिली.

बाप-लेक सारुळला आपल्या गावी गेले होते. रविवारी सकाळी राजुद्दीन सय्यदने आपल्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. पोलीस पंचनाम्यानंतर उच्चस्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आला. राजूद्दीनच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. मयताचे वडील मैनोदीन रसूल सय्यद यांच्या तक्रारीवरून केज पोलीसात मयताच्या पत्नी व सासूच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माळी व पोलीस नाईक मुकुंद ढाकणे हे करत आहेत.

मयताच्या खिशात आढळली मृत्यू पुर्वी लिहीलेली चिठ्ठी-
"माझ्या पत्नी व सासू यांनी मला आजपर्यंत खूप त्रास दिला. माझी सासू सतत माझ्याशी भांडणे करुन माझ्या पत्नीला माझ्यापासून घेऊन जात असे.
माझ्या कुंटुबीयांना ही त्रास देत असे. यापुढे माझ्या कुंटुंबीयांना मी त्रास देऊ शकत नाही. मी आई-वडील व मुले यांची माफी मागतो." आशा आशयाचा चिठ्ठीत  उल्लेख केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com