सेलू तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत सेलू येथील सुदाम जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या केली.

सेलू - म्हाळसापूर (ता. सेलू) येथील एका शेतकऱ्याने सततची नापिकी व बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे गुरूवारी (ता. ५) रोजी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आले. घटनेची नोंद सेलू पोलिस ठाण्यात झाली आहे.

म्हाळसापुर येथील शेतकरी सुदाम बापुराव जाधव (वय ३२)  यांनी शेती पिकविण्यासाठी बँक व खाजगी सावकाराकडून कर्ज काढले होते. मात्र सततच्या नापिकीमुळे कर्ज फेडणे तर सोडाच पण दैनंदिन व्यवहार भागवणेही अशक्य होऊन बसले होते. बुधवारी (ता. ४) रात्री उशिरा जेवण करून स्वतःच्या राहत्या माळवदाच्या घरात झोपले होत. गुरुवारी सकाळी ते उठले कसे नाही म्हणून त्याच्या आईने दरवाजा वाजवला नऊ दहा वाजले तरी दरवाजा उघडला नाही. म्हणून आईने शेजार्‍यांच्या मदतीने दरवाजा उघडला तर मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत माळवदाच्या आढूला लटकलेला दिसून आले. या घटनेचे माहिती कल्याण सुंदरराव जाधव यांनी सेलू पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.घटनेचा पुढील तपास शंकर पांढरे हे करित अाहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Suicide of Farmer in Selu Taluka