सावकारच्या जाचामुळे आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

परभणी - अवैध सावकारीतून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पोरवड (ता. परभणी) येथील राजेभाऊ माणिकराव गिराम या शेतकऱ्याने शुक्रवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गिराम यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन जिल्हा उपनिबंधक कार्यालय गाठले. तेथे "मला न्याय द्या', अशी मागणी करीत सोबत आणलेल्या बाटलीतील विष प्राशन केले. कर्मचाऱ्यांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गिराम यांनी दिलेल्या निवेदनात सावकारासह निबंधक अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत.
Web Title: suicide trying by money lender torment