हक्‍काच्या पाण्यासाठी आत्मदहनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

औरंगाबाद -"हक्‍काच्या पाण्यावर कुठलेही आरक्षण टाकू नये, भूसंपादनाचा मोबदला ताबडतोब आजच्या शासन निर्णयानुसार मिळावा,' यांसह पाच मागण्यांसाठी गंगापूर तालुक्‍यातील शेतकरी शुक्रवारी (ता.13) गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयावर धडकणार आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशाराही दिला आहे. 

या मागण्यांबाबत 4 एप्रिलला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांना निवेदन देण्यात आले. 13 एप्रिलपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता. मागण्यांविषयी निर्णय न झाल्याने शेतकरी उद्या गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या औरंगाबाद येथील कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती समितीच्या वतीने प्रताप साळुंके यांनी दिली. 

Web Title: Suicide Warning for Water

टॅग्स