आत्महत्या प्रकरणी दोन मुली, प्रियकरांवर गुन्हा दाखल

विलास शिंदे
शनिवार, 19 मे 2018

सेलू : शहरातील सर्वोदयनगर परिसरात राहत्या घरी गुरूवारी (ता.१७) मध्यरात्री गळफास घेवुन वंदना साळवे (वय ३५) या महिलेने आत्महत्या केली होती. त्या प्रकरणी मयताचे वडिल यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन मयत वंदना साळवे यांच्या दोन मुली व त्यांचे प्रियकर यांच्या विरोधात सेलू पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.१८) राञी उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेलू : शहरातील सर्वोदयनगर परिसरात राहत्या घरी गुरूवारी (ता.१७) मध्यरात्री गळफास घेवुन वंदना साळवे (वय ३५) या महिलेने आत्महत्या केली होती. त्या प्रकरणी मयताचे वडिल यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन मयत वंदना साळवे यांच्या दोन मुली व त्यांचे प्रियकर यांच्या विरोधात सेलू पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.१८) राञी उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत वंदना साळवे यांचे वडिल दामोधर आश्रोबा डंबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, संबंधित मयत महिलेचा पती २००४ साली मयत झाल्यापासून सेलू येथील सर्वोदयनगर येथे वडील दामोदर आश्रोबा डंबाळे यांच्यासोबत राहत होत्या. त्यांच्या मुली उर्मिला व शिवानी त्यांच्या सोबत राहत नसल्याने वंदना साळवे नेहमीच चिंतेत राहायच्या. गुरूवारी रात्री बारा वाजता आई आणि वडीलांसोबत जेवण झाल्यावर सर्वजण एकत्रच झोपले होते. शुक्रवारी (ता.१८) रोजी सकाळी साडेसहा वाजता झोपलेल्या जागेवर ती दिसून आली नाही. म्हणून तिच्या आईने पतीला झोपेतून उठवून मुलीचा शोध घेण्यास सांगितले. सर्वत्र शोध घेतल्यानंतर घराच्या पाठीमागील रूममध्ये छताच्या हुकाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

या प्रकरणी  त्यांच्या दोन मुलींचे दोन मुलांसोबत शारिरिक संबध होते हे मयत वंदना साळवे यांना मान्य नव्हते. वेळोवेळी त्यांच्या मुली व त्यांचे प्रियकर मयत वंदना साळवे यांना शिवीगाळ, मारहाण करत जिवे मारण्याच्या धमक्या देत होते. या सर्व प्रकारास कंटाळुन माझ्या मुलीने आत्महत्या केली असुन या आत्महत्यापुर्वी चिठ्ठी लिहुन तसेच डाव्या हाताच्या तळहातावर या दोन मुली व त्यांचे दोन प्रियकर या चार जणांची नावे लिहीलेले आसल्याने या आत्महत्यास दोन मुली व त्यांचे प्रियकर जबाबदार असल्याची तक्रार सेलू पोलिस ठाणे येथे दाखल केली आहे. दामोधर डंबाळे यांच्या फिर्यादी वरुन उर्मिला दिनेश साळवे, शिवानी दिनेश साळवे, रवि बबनराव वटाणे, संतोष सोपान गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा 125/18 नुसार भारतीय दंड विधान कलम 306, 323, 504, 506, 34 व कलम 3 (2) (5) अ प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरील घटनेचा तपास पोलिस उपविभागीय अधिकारी रेणुका वागळे, बिट जमादार यु. के. लाड, उमेश बारहाते हे करत आहेत.

 

Web Title: suicides case has been registered against two daughters and lover